शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी वसाहतींच्या विकासाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:15 IST

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचे विकसन करण्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बराच गदारोळ झाला. आधी या विषयावर हात वर करून मतदान घेण्यात आले होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी लेखी मतदानाची मागणी केली.

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचे विकसन करण्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बराच गदारोळ झाला. आधी या विषयावर हात वर करून मतदान घेण्यात आले होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी लेखी मतदानाची मागणी केली. तसेच सत्ताधारी भाजपा या वसाहतींच्या विकसनावरून बांधकाम व्यावसायिकाचा फायदा व महापालिकेचे नुकसान करत असल्याचा आरोप करण्यात आला. भाजपाच्या स्पष्ट बहुमतामुळे तसेच काँग्रेसची त्यांना साथ मिळाल्याने हा विषय मंजूर झाला; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या विषयावर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.या वसाहती पाडून तिथे नव्या वसाहती बांधण्याचा विषय सन १९९० पासून प्रलंबित आहे. नव्यानेच निवडून आलेल्या धीरज घाटे, अजित दरेकर, सोनाली लांडगे, सम्राट थोरात आदी सदस्यांनी प्रयत्नपूर्वक या विषयाला गती दिली. त्यामुळे हा प्रस्ताव आणण्यात आला. २०१०च्या त्या बांधकाम व्यावसायिकालाच हे काम त्याच निविदेनुसार देण्याचा विषय होता. मात्र, तसे करताना त्यात घरांच्या क्षेत्रफळात तसेच बांधकाम व्यावसायिकाला द्यायच्या जागेत काही बदल करण्यात आला. बदल केला तर मग नव्याने निविदा काढायला हवी, असे मत माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी व्यक्त केले व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच सदस्य या विषयावर तुटून पडले. विशाल तांबे, भय्या जाधव, सुनील टिंगरे, बाबूराव चांदेरे आदी सदस्यांनी यावरून भाजपावर टीका केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले त्यामुळे चिडले. त्यांनी ८ वर्षे तुम्ही झोपला होता का, आता आम्ही विषय मंजूर करतो आहोत तर आडकाठी का आणता, अशी विचारणा केली.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही चिडले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. दत्ता धनकवडे यांनी या विषयाला उपसूचना दिली. त्यात त्यांनी जादा चटई क्षेत्र महापालिकेला मिळावे असे सुचवले. धीरज घाटे, सोनाली लांडगे, आरती कोंढरे, सम्राट थोरात, अजित दरेकर, अजय खेडेकर आदी सदस्यांनी वसावहतींचे विकसन त्वरित व्हावे, असे मत व्यक्त केले. लेखी मतदानात भाजपाच्या बाजूने हा विषय मंजूर झाला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका