शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जमीन व्यवहारांवरील बंदीचा मार्ग मोकळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 01:41 IST

पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना सरकारने काढल्याने येथील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे : पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना सरकारने काढल्याने येथील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन या व्यवहारांवर कधीही बंदी घालू शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.पुरंदर विमानतळ उभारणीसाठी भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने काढणे आवश्यक होते. त्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) शासनाला सादर केला होता. मात्र सरकारने त्याची अधिसूचना काढली नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करता आली नव्हती. तसेच, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीदेखील भूसंपादनाच्या अधिसूचनेनंतरच जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना बंदी घालता येईल, असे जून महिन्यात सांगितले होते.पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नागरी हवाई विभागाची परवानगी आणि राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतरचा हा सर्वात मोठा निर्णय आहे. येथील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांतील २ हजार ८३२ हेक्टर जागा राज्य सरकारने विमानतळासाठी निश्चित केली आहे. या जागेला महत्त्वाच्या असलेल्या संरक्षण विभागाबरोबरच एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियासह केंद्र शासन स्तरावरील विविध विभागांच्या मान्यता मिळाल्या आहेत.जमिनीच्या मोबदल्यासाठी २ हजार ७१३ कोटी रुपये, तर फळझाडे, विहिरी, ताली आदींसाठी ८०० कोटी रुपये अशी एकूण ३ हजार ५१५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या भूसंपादनास येणाऱ्या खर्चास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, त्यात सातही गावांतील बाधित गट क्रमांक आणि गावनिहाय किती हेक्टर क्षेत्र बाधित होईल, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.>म्हणून जमीन व्यवहारांवर घालतात बंदीकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी एका बैठकीत विमानतळाच्या जमीन खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याची सूचना केली होती. एका सावर्जनिक प्रकल्पादरम्यान काही व्यक्तींनी जमिनीचे भाव कृत्रिमरीत्या वाढविल्याचे समोर आले होते. सरकारच्या नुकसानभरपाई धोरणानुसार बाधित व्यक्तींना पाचपट रक्कम भरपाईपोटी दिली जाते. हा दर ठरविताना गेल्या तीन वर्षांतील महत्तम दराची सरासरी काढली जाते. या प्रक्रियेचा फायदा उठविण्यासाठी काही व्यक्ती बाजारभावापेक्षा अधिक किमतीत जागा खरेदी केल्याचे दाखवितात. तसा मुद्रांक शुल्कदेखील भरण्यात येतो. त्यामुळे नुकसानभरपाईचा आकडा वाढून प्रकल्पाची किंमत वाढते. प्रकल्पाची किंमत कृत्रिमरीत्या वाढू नये, यासाठी बाधितांच्या जमीन खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.>बाधित होणारेक्षेत्र हेक्टरमध्येवनपुरी 339कुंभारवळण 351उदाचीवाडी 261एखतपूर 217मुंजवडी 143खानवडी 484पारगाव 1037एकूण 2832