शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

झगमगाटासाठी फुकटची वीज; पुण्यातील हजारो मंडळांकडून अनाधिकृत विजेचा वापर

By नितीन चौधरी | Updated: September 7, 2022 12:06 IST

वारंवार विनंती करूनही शहरातील केवळ ११६ मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतला

पुणे : कोरोनामुळे गेली दोन वर्षे सार्वजनिकरित्या साजरा न झालेल्या गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध यंदा हटल्याने भक्तांचा व नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. शहरात सुमारे साडेपाच हजार नोंदणीकृत व बिगरनोंदणी असलेल्या मंडळांनी बाप्पापुढे विद्युत रोषणाईचा झगमगाट केला आहे.

वारंवार विनंती करूनही शहरातील केवळ ११६ मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतला आहे. बहुतांश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर करण्यावर भर दिला आहे. गणेशाेत्सव हा धार्मिक अस्मितेचा मुद्दा असल्याने महावितरण कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळेही या मंडळांना फावले आहे.

पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीत हजारो सार्वजनिक गणेश मंडळ अत्यंत उत्साहाने यावर्षी गणेश उत्सव साजरा करत आहेत. सगळीकडे विद्युत रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळत आहे. पुणे शहरात महापालिकेकडे नोंदणी केलेली सुमारे ३,५६६ मंडळे आहेत. बिगर नोंदणी असलेल्या मंडळांची संख्या सुमारे २ हजार असल्याचे बोलले जात आहे. या मंडळांनी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच अधिकृत वीजजोड घ्यावी, यासाठी महावितरणने आवाहन केले होते.

गणेश मंडळे आणि वीजजाेड

- पुणे परिमंडळात पुणे महापालिका, पिंपरी - चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो. गणेशाेत्सवासाठी घरगुती दरांपेक्षाही स्वस्त दराने वीज देण्याचे महावितरणने जाहीर केले होते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली होती. एवढे असूनही अधिकृत वीज जोडणीसाठी बहुसंख्य गणेश मंडळ महावितरण कार्यालयात फिरकलेसुद्धा नाहीत.- शहरात साडेपाच हजार मंडळांपैकी केवळ ११६ मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी शहरात नोंदणीकृत असलेली १,७४३ मंडळे व एवढीच संख्या असलेल्या बिगर नोंदणीकृत मंडळांपैकी केवळ ३० मंडळांनीच अधिकृत वीजजोड घेतला आहे.

मंडळांकडून केराची टोपली

गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोड घेऊन उत्सव साजरा करण्याचे आवाहन महावितरणने केले होते. अनधिकृत वीज जोडामुळे विजेच्या अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. वीजसुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता घेण्यात आलेले अनधिकृत वीजजोड हे जीवघेणे ठरत आहेत. अधिकृत वीज जोड घेताना विद्युत संचाच्या मांडणीची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाते. त्यामुळे अपघात टाळता येतात. गणेशोत्सवात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणूनच मंडळांनी अधिकृत वीजजोड घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले होते. त्याला या मंडळांनी केराची टोपली दाखवली आहे.

''गणेशोत्सव धार्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. अधिकृत वीजजोड घ्यायला हवा. महावितरणचे कर्मचारी अनधिकृत वीजजोड तोडण्यास गेल्यानंतर हल्ला होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव नाही. - महावितरणचे वरिष्ठ अधिकारी'' 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजGanesh Mahotsavगणेशोत्सव