पुणे : जिल्हा हगणदरीमुक्त करण्याच्या यापूर्वी जिल्हा परिषद स्तरावर अनेक घोषणा करण्यात आल्या. ते शक्य झाले नाही; मात्र आता शासनानेच राज्यातील १० जिल्हे हगणदरीमुक्त करण्याची घोषणा केली असून, त्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. या १० जिल्ह्यांत सर्वाधिक शौचालये बांधावी लागणारा जिल्हादेखील पुणेच असून, अद्याप १ लाख ३२ हजार ४८२ शौचालये बांधणे बाकी आहे. १२ मे २०१६ रोजी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपला जिल्हा यंदा हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापर्यंत ८ लाख ८९ हजार १३७ एवढी वैयक्तिक शौैचालये पूर्ण केली असून, ४९६ ग्रामपंचायती, १४ तालुके व सिंधुदुर्ग जिल्हा हा फक्त हगणदरीमुक्त झाला आहे. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सचिवांनी २०१६-१७ वर्षात आपला जिल्हा हा हगणदरीमुक्त करायचा आहे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपण या बाबीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून, आपली सर्व शासकीय यंत्रणा त्यात समाविष्ट करून सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना द्या. आराखडा तयार करून तशी अंमलबजावणी सुरू करा, असे कळविले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात १४०६ ग्रामपंचायती असून त्यांपैैकी ३४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. यात मुळशी तालुका हगणदरीमुक्त झाला असून, अद्याप १ हजार ६२ ग्रामपंचायती बाकी असून १ लाख ३१ हजार ६३२ कुटुंबांकडे शौैचालये नाहीत. ३१ मार्च २०१७ पर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे मोठे काम जिल्हा परिषद प्रशासनाला करावे लागणार आहे. वेल्हे या सर्वांत कमी तालुक्यात २८ ग्रामपंचायती व फक्त ४८१ कुटुंबे शिल्लक असून, ते लवकरच पूर्ण होतील.शासनानेच वरील आदेश दिले असून, आम्हाला मार्चअखेर जिल्हा हगणदरीमुक्त करावा लागणार आहे. तशा सूचना त्या-त्या विभागाला दिलेल्या असून, काम सुरू केले आहे. - दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारीतालुका ग्रा. पं. शौचा. बांध.आंबेगाव८३६२६८बारामती९0१४७३0भोर८७१८७0दौंड७४१६२७२हवेली८२९३७९इंदापूर१0८३१६२७जुन्नर११५८५६५खेड१४0११२२२मावळ९५१0५१८मुळशी00पुरंदर८५७९0९शिरूर७५१२७९१वेल्हा२८४८१शिल्लक ग्रा.पं. व कुटुंब संख्या
मार्चअखेर जिल्हा हगणदारीमुक्त करा
By admin | Updated: May 26, 2016 03:29 IST