शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्री अँड ईझी’, ‘पिंपळ’ सर्वोत्कृष्ट, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 07:36 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चीनच्या जून जेंग दिग्दर्शित ‘फ्री अँड इझी’ या चित्रपटाने दहा लाख रुपयांचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा बहुमान मिळवला.

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चीनच्या जून जेंग दिग्दर्शित ‘फ्री अँड इझी’ या चित्रपटाने दहा लाख रुपयांचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा बहुमान मिळवला. ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पाच लाख रुपयांच्या पुरस्कारावर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पिंपळ’ या चित्रपटाने आपले नाव कोरले. ‘म्होरक्या’ आणि ‘पिंपळ’ने सर्वाधिक पुरस्कार पटकावित पिफवर मोहोर उमटवली.गेले आठवडाभर विविध देशांच्या चित्रपटांची मेजवानी मिळालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्काराचा समारोप सोहळा गुरुवारी कोथरूड येथील सिटी प्राईड येथे रंगला. जागतिक, मराठी आदी विविध विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या पुरस्कारांची या वेळी घोषणा झाली. ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’ अशा तगड्या व लोकप्रिय चित्रपटांवर मात करत ग्रामीण भागातील जीवनाचा बाज जपणाºया ‘म्होरक्या’ व ‘पिंपळ’ या चित्रपटांनी पिफ गाजवला.अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ चित्रपटासाठी गिरीश जांभळीकर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकार, रमण देवकर यास सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले. गजेंद्र अहिरे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. सचिन खेडेकर यांना स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ‘नशीबवान’ या चित्रपटासाठी मिताली जगताप यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. यावेळी एफटीआयआयच्या विद्यार्थी मलयज अवस्थी याचा विशेष सन्मान करण्यात आला.