बारामती : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बारामती तालुक्यात पवार घराण्यातील चौथी पिढी राजकारणात आली आहे. रोहित राजेंद्र पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने शिर्सुफळ- गुणवडी गटातून उमेदवारी दिली. पवारांनी घराणेशाही जपलेली असताना भाजपाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे यांनी पत्नीला माळेगाव-पणदरे गटातून रिंगणात उतरवले आहे. घरातच उमेदवारी दिल्याने संपूर्ण कुटुंब, नातेवाईक प्रचारात उतरली आहेत.रोहित पवार बारामती अॅग्रो या खासगी साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्यादेखील भुवया उंचावल्या. या गटात भाजपाच्या उमेदवारांचा घोळच राहिला आहे. अॅड. जी. बी. गावडे यांच्या मतदार यादीतील नावाच्या घोळाचा निर्णय सोमवारी होणार आहे.
पवार घराण्यातील चौथी पिढी राजकारणात
By admin | Updated: February 13, 2017 02:19 IST