शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थ वार्षिकीचे काम अर्धवट; बिले मात्र अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:13 IST

इंदापूर नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या चतुर्थ वार्षिकीचे काम अर्धवट असून, त्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने त्या बाबीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोमवारी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली.

इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या सन २०१७-१८च्या चतुर्थ वार्षिकीचे काम अर्धवट असून, त्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने त्या बाबीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोमवारी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात सर्व १० नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले आहे.आज दुपारी नगर परिषदेतील विरोधी गटाचे नेते गजानन गवळी, पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली, की अमरावतीच्या कोअर कंपनीकडे इंदापूर नगर परिषदेने सन २०१७-१८ या वर्षाचा चतुर्थ वार्षिकी तयार करण्याचा ठेका दिला आहे. ६३ लाख रुपयांना दिलेल्या या ठेक्याचे ४४ लाख रुपये यापूर्वीच दिले आहेत. मात्र, दि. ३१ डिसेंबरच्या आत हे काम पूर्ण झाले नाही.मालमत्ता चतुर्थ वार्षिकी आकारणीनंतरची अंतिम बिले देणे बाकी आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चतुर्थ वार्षिकीचे राहिलेले बिल देण्यासाठीचा ठराव प्रशासनाने सभागृहासमोर ठेवला होता. त्याला आम्ही सर्वांनी विरोध केला, असे सांगून ते म्हणाले, की हे काम पूर्ण नाही. त्याबाबत सभागृहाला अंधारात ठेवण्यात आले आहे. याबाबत विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. ठेकेदाराचे बिल देण्यासाठी संबंधित अधिकारी घाई का करीत आहेत, हे समजू शकत नाही. सदर बाबीची चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.चतुर्थ वार्षिकीचे काम पूर्ण झाल्याशिवाय नगर परिषदेला घरपट्टी व पाणीपट्टीची आकारणी होणार नाही. बिले मिळाली नाहीत, तर ती नागरिकापर्यंत पोहोचणार कधी? मार्चअखेरपर्यंत वसुली होणार कशी? असे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. नंतरचा बोजा नागरिकांवर पडणार असल्याने आपण या संदर्भात जिल्हाधिकाºयांकडे निवेदन पाठविले आहे. या निवेदनावर गजानन गवळी, पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ, अमर गाडे, राजश्री मखरे, मधुरा ढवळे-पवार, उषा स्वामी, हेमलता माळुंजकर, नाना राऊत आदींच्या सह्या आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.>...ते काम पूर्ण झालेले आहेनगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की बिल देण्यासाठी घाई करण्याचा काही विषय नाही. जुलै २०१७मध्ये संबंधित ठेकेदाराला ४१ लाख रुपयांचे बिल देण्यात आले होते. आपण मुख्याधिकारीपद स्वीकारल्यापासून त्या ठेकेदाराला कसलेही बिल दिलेले नाही. आत्ता ते काम पूर्ण झालेले आहे.याबाबत ठरावदेखील झाला आहे. हा निधी शासनाचा आहे. तो विहीत वेळेत खर्च होणे महत्त्वाचे आहे. त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्तांची भेट झाली. त्या वेळी हे बिल का दिले गेले नाही, याबाबत आपणास विचारणा झाली होती.