निवडणूक जाहीर होताच कासार आंबोलीतील राजकीय गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. प्रचार शिगेला पोहोचला असतानाच तेरा जागांपैकी चार जागा या बिनविरोध झाल्या आहेत. या मध्ये वार्ड क्रमांक एक मधून सुवर्णा राजेंद्र मारणे, रंजित प्रकाश गायकवाड तर वार्ड क्रमांक तीन मधून छाया संजय भिलारे, उमेश दत्तात्रय सुतार यांचा समावेश असून उर्वरित नऊ जागेसाठी मतदान होणार आहे. यासाठी सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे तेव्हा या सर्व घटने नंतर कोणाच्या पदरात विजय पडणार तर कोणाच्या पदरात पराभव पडणार हा येणारा काळच सांगेल. सुवर्णा मारणे यांच्या बिनविरोध निवडीने विजयाची हॅट्ट्रिक झाली आहे तर रणजित गायकवाड यांच्या बिनविरोध विजयाने ५० वर्षानंतर गायकवाड परिवाराला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. याच बरोबर छाया भिलारे व उमेश सुतार यांनाही दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
कासार आंबोली ग्रामपंचायतीच्या तेरा जागांपैकी चार जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST