शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बाललैंगिक अत्याचारातील ४ आरोपींना केले जेरबंद

By admin | Updated: May 6, 2015 06:13 IST

शहरात ४ ठिकाणी झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पुणे : शहरात ४ ठिकाणी झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ७ वर्षांच्या मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनमध्ये सफाईकाम करणारा विकास जिभाऊ पाटील (वय २९, रा. खेसे चाळ, लोहगाव, सध्या एअरफोर्स स्टेशन क्वार्टर्स) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी ही दुसरीत शिकत असून, दि. २२ ते २४ एप्रिलदरम्यान आरोपीने पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. तिला घरात नेऊन त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी धावत घरी आली आणि झालेला प्रकार तिने आईला सांगितला. यााबाबत मुलीच्या वडिलांना कळाल्यानंतर त्यांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने कृत्य केले नसल्याचे सांगितले. तक्रार दिल्यास एअरफोर्स स्टेशनच्या आतमध्ये येऊ देणार नाही, अशी धमकीही दिली होती.घरात जबरदस्तीने घुसून अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग करणाऱ्या महेश ज्ञानेश्वर खराबे (२५, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. २० एप्रिल रोजी पीडित मुलगी राहत्या घरी एकटी असताना आरोपीने पीडित मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. (प्रतिनिधी)अल्पवयीन मुलीचा पाठलाग> येरवडा येथे बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढणारा निखिल अर्जुन वाघमारे (वय २४, रा. खडकी, येरवडा) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. आरोपीने पीडित मुलीला त्रास देऊन तिला बदनाम करण्याचीही धमकी दिली व मोबाईलवरून अश्लील मेसेजही पाठविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. > अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी वेल्हा पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांपैकी हेमंत गणेश कुबडे (२२, पर्वती पायथा, भवानीनगर, जनता वसाहत) याला अटक केली आहे. त्याची पत्नी ज्योती (१९) हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीचे अपहरण केले. त्याला कुबडे दाम्पत्याने आश्रय दिल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचे फियार्दीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींवर बलात्कार, अपहरण, अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.