शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लाखेवाडी हल्ला प्रकरणी चार आरोपींना अटक

By admin | Updated: June 30, 2015 00:10 IST

लाखेवाडी येथील हल्ला प्रकरणातील ४ आरोपींना आज (दि. २९) इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ५ झाली आहे.

इंदापूर : लाखेवाडी येथील हल्ला प्रकरणातील ४ आरोपींना आज (दि. २९) इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ५ झाली आहे.राजू ऊर्फ राजेंद्र बाळकृष्ण ऊर्फ कृष्णा शिंगाडे (वय ४०), विलास पांडुरंग खुरंगे (वय ५५), नामदेव दादा खुरंगे (वय ४०), कृष्णा शंकर शिंगाडे (वय ६५, सर्व रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. कृष्णा शिंगाडे याला सोमवारी (दि. २९) दुपारी बाराच्या सुमारास, तर उर्वरित तिघांना चारच्या सुमारास तालुक्यातील शेळगाव येथून अटक करण्यात आली. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार गलगले, महेश माने, संजय जाधव यांनी ही कामगिरी केली. या प्रकरणातील संजय बाळकृष्ण शिंगाडे, महादेव पांडुरंग खुरंगे हे दोन प्रमुख आरोपी अद्यापही फरारी आहेत. पकडण्यात आलेला नामदेव दादा खुरंगे याचा प्रमुख आरोपींमध्ये समावेश नव्हता.या पार्श्वभूमीवर, दलित संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनावर या संघटना ठाम आहेत. हे प्रकरण ज्या अधिकाऱ्यामुळे अधिक गुंतागुंतीचे झाले, ते सहायक पोलीस निरीक्षक पी. व्ही. काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय, आरोपींवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील इतर कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे. (वार्ताहर)महामोर्चाचा इशारासर्व आरोपींनी त्वरित अटक करण्यात यावी; अन्यथा राज्यातील संघटना एकत्रित करून इंदापूर तहसील कचेरीवर महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रिपाइं-मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्ञानदेव खंडागळे यांनी दिला़ निषेध सभेत खंडागळे बोलत होते़