शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आई आयुष्याचा पाया...

By admin | Updated: May 9, 2016 01:06 IST

’आई’ हे एक असे नाते आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया असते. माणूस जसजसा आयुष्यात पुढे जातो, तसे ते नाते थोडे मागे पडल्यासारखे वाटते; पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई असतेच

पुणे : ’आई’ हे एक असे नाते आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया असते. माणूस जसजसा आयुष्यात पुढे जातो, तसे ते नाते थोडे मागे पडल्यासारखे वाटते; पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई असतेच, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त करीत ‘आई’चे महत्त्व विशद केले. निमित्त होते, जागतिक मातृत्व दिनानिमित्त लेखिका सुधा मेनन यांनी आयोजित केलेल्या ‘मेमरीज आॅफ ग्रोइंग अप विथ मॉम’ या कार्यक्रमाचे.प्रख्यात बॉलरूम नर्तक व नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर व त्यांची आई राणी सोपारकर, एकांश ट्रस्टच्या संस्थापिका अनिता अय्यर व त्यांची कन्या, तसेच विविध क्षेत्रांतील अनेक यशस्वी महिला व त्यांची मुले या वेळी उपस्थित होते.मातृत्वाविषयी आपले अनुभव मांडताना अनिता अय्यर म्हणाल्या, ‘आई म्हणून मुलांना वाढविताना, अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. आईचे मुलांवर प्रेम असतेच; पण मुलांची प्रत्येक कृती आईला आवडेलच, असे नाही. वेळ येईल, तेव्हा आईचे मत मांडणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, मुलांनादेखील त्यांचे मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य हवे.’ कौटुंबिक रचनेतील स्त्रीच्या भूमिकेचाही मागोवा याप्रसंगी घेण्यात आला. स्त्री मुलाला जन्म देते, म्हणजे ते अपत्य सर्वस्वी तिचीच जबाबदारी आहे, हा विचार चुकीचा आहे, असे मत या वेळी मांडले गेले. याविषयी बोलताना, बँकेच्या एम्प्लॉयी एंगेजमेंट विभागाच्या ग्लोबल हेड अनुजा काळे-अगरवाल म्हणाल्या, ‘माझे पती व मी आमच्या मुलाची जबाबदारी विभागून घेतो. यामुळे माझ्यावर अतिरिक्त भार पडत नाही. मला व माझ्या पतीला आपापली करिअर्स व्यवस्थित सांभाळता येतात.’ (प्रतिनिधी)