शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजणार; पण....

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 7, 2021 16:09 IST

कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून राज्यातील गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती.

पुणे : पुणेकरांसाठी एक गोष्ट अत्यंत अभिमान व गौरवाची राहिली आहे ती म्हणजे लाभलेला ऐतिहासिक ठेवा.पुणे जिल्ह्यातील सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, शिवनेरी  राजमाची, रायरेश्वर यासारख्या गड किल्ल्यांनी पुण्याच्या वैभवात मोलाची भर टाकली आहे. या गडकोटांनी पर्यटक आणि ट्रेकर्सला नेहमीच भुरळ घातली आहे. परंतु, कोरोना संकटामुळे मागील काही महिन्यांपासून राज्यातील गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती. मात्र आता अनलॉकमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणताना गड किल्ल्यांसह ऐतिहासिक स्थळे पर्यटनाला खुली करण्यात आली आहे. 

पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, गड , किल्ले पर्यटनासाठी सुरु करण्याबाबतचा आदेश नुकताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. मात्र पर्यटनाला परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत आवश्यक सर्व काळजी व नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. 

नेहमीच भटकंती, पर्यटन, ट्रेकिंग याला पसंती देणाऱ्या पुणेकरांना कोरोनाकाळात आपल्या लाडक्या गड किल्ल्यांपासून दूर राहावे लागले. तसेच गड, किल्ले, येथे पर्यटकांवर अवलंबून असलेले व्यवसाय करणारी कुटुंबे मोठ्या आर्थिक संकटात सापडली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मात्र इतिहासप्रेमींसह या सर्व व्यावसायिक कुटुंबाना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. मोठ्या कालावधीनंतर गड किल्ल्यांवर पर्यटकांची गजबज दिसणार आहे. यामुळे आनंद द्विगुणित झाला आला तरी कोरोना संकट अजून संपलेले नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असणार आहे. 

 

पुणेकरांसाठी नेहमीच 'फेव्हरेट' असलेला सिंहगड पुण्यापासून अगदी जवळ असलेला सिंहगड पुणेकर व पर्यटकांचा नेहमीच फेव्हरेट राहिला आहे. शनिवार , रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळत असते. येथील झुणका , पिठलं भाकरी, कांदाभजी, मातीच्या भांड्यातील दही, वांग्याची भाजी पर्यटकांची आकर्षणच केंद्रबिंदू राहिला आहे. मागील वर्षी आलेल्या 'तान्हाजी' सिनेमापासून तर सिंहगडावर मोठी गर्दी वाढली आहे.  

 

टॅग्स :PuneपुणेFortगडhistoryइतिहासTrekkingट्रेकिंगtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी