शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

वर्तुळाकार रस्त्याच्या निधीचा फार्म्युला अद्यापही अनिश्चित : ६ हजार ५०० कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 11:47 IST

जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका अशा दोन्ही विभागातील भूसंपादन कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने या कामाला कासवगती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनात रस्त्याच्या कामासंबधीची बैठक१९८७ पासून प्रलंबितच: महिनाभराची मुदतवाढीनंतर एकच प्रकार सादर या कामासाठी महापालिकेकडून काही लाख रूपये देऊन एक सल्लागार कंपनी नियुक्त

पुणे : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करणाऱ्या ‘हाय कपॅसिटी मास्ट ट्रन्झिस्ट रोड’चा (एचसीएमटीआर) साडेसहा हजार कोटी रूपयांचा खर्च कसा उभा करायचा याचा फार्म्युलाच अद्याप निश्चित व्हायला तयार नाही. याच कामासाठी काही लाख रूपये देऊन नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने एकदम पाचसहा प्रकार सादर केल्याने त्याला महिनाभराची मुदतवाढ देऊन एकच प्रकार सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनात रस्त्याच्या कामासंबधीची बैठक झाली. त्यासाठी पथ विभागाचे प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर, भूसंपादन उपायुक्त अनिल मुळे, लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर तसेच अन्य विभागांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. या रस्त्याच्या कामासाठी लागणारा साडेहजार कोटी रूपयांचा निधी कसा उभा करायचा यासाठी महापालिकेने काही लाख रूपये देऊन एक सल्लागार कंपनी नियुक्त केली आहे. या कंपनीने निधी उभा करण्यासाठी एकदम पाचसहा पद्धतीचे सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने डीफर्ड पेमेंट (ठेकेदार कंपनीने गुंतवणूक करायची व त्यांना महापालिकेने टप्प्यटप्याने पेमेंट अदा करायचे), क्रेडीट बाँड (कर्जरोखे), पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) व टोल वसुली, जाहिरातींचे उत्पन्न या प्रकारांचा समावेश होता. आयुक्तांनी टोल लावता येणार नाही म्हणून ती पद्धतच बाद ठरवली. अन्य पद्धतींबाबत चर्चा झाली. मात्र, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण कंपनीने केले नाही. त्यामुळे नक्की निधी कसा उभा करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकच एक पद्धत तयार करावी व त्याचे सादरीकरण करावे असे आयुक्तांनी कंपनीला सांगितले. त्यासाठी महिनाभर मुदतवाढ देण्यात आली. सन १९८७ च्या विकास आराखड्यात हा रस्ता दर्शवण्यात आला होता. त्यावेळी त्याचा खर्च होता ५०० कोटी रूपये. तो शहराच्या त्यावेळी बाहेर असणाऱ्या भागातून जात होता. हा सर्व भाग म्हणजे शहराचा मध्यभाग झाला असून त्यामुळेच काही वर्षांपुर्वी हा संपुर्ण वर्तुळाकार मार्ग उन्नत (इलेव्हेटेड- मुळ रस्त्याच्या वरून) करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्याच्या खर्चात एकदम वाढ झाली. शहरातंर्गत वाहतूकीवर अवजड वाहतूकीचा येणारा ताण कमी करण्यासाठी म्हणून हा रस्ता प्रस्तावीत करण्यात आला असून गेल्या अनेक वर्षांपासून तो रखडला आहे. नगरसेवक आबा बागूल यांनी या रस्त्यासाठी लागणाºया जमिनीचे संपादन सुरू करावे म्हणून मध्यंतरी आयुक्तांचे वाहन साखळदंडानी बांधून ठेवण्याचे आंदोलन केले होते.पुणे विद्यापीठापासून हा रस्ता सुरू होतो व सेनापती बापट रस्ता, दांडेकर पूल,अप्सरा चित्रपटगृह, वानवडी, हडपसर, मगरपट्टा, नगररोड, औंध, पाषाण व पुन्हा विद्यापीठ असा वर्तुळाकार मार्गाने संपतो.सुमारे ३६ किलोमीटर अंतराचा हा रस्ता आहे. त्यासाठी लागणाऱ्या एकूण जमिनींपैकी ३० टक्के जमीन सरकारी मालकीची म्हणजे वन विभाग, पाटबंधारे, राज्य राखीव दर यांची आहे. त्यातील काही जागेचे संपादनही करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका अशा दोन्ही विभागातील भूसंपादन कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने या कामाला कासवगती प्राप्त झाली आहे. उर्वरित भूसंपादनासाठी एकूण खर्चात १ हजार ५०० कोटी रूपये गृहित धरण्यात आले आहे. मात्र तेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे खर्चात सातत्याने वाढ होत आहे. तरीही प्रशासन व पदाधिकारी रस्त्याच्या कामात लक्ष घालायला तयार नाहीत. 

टॅग्स :PuneपुणेSaurabh Raoसौरभ रावPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका