शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा

By admin | Updated: January 13, 2017 02:04 IST

ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनी सन २०११-१२ या

यवत : ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनी सन २०११-१२ या आर्थिक वर्षात सुमारे ८ लाख रुपयांचा ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे.तत्कालीन सरपंच श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनी ग्रामपंचायत दप्तरी अनियमितता ठेवत निधीचा अपहार केल्याची तक्रार दौंड तालुका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तम गायकवाड व शब्बीर सय्यद यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे केली होती. या प्रकरणावर त्यावेळी शासकीय पातळीवर चौकशी होऊन सरपंच शेंडगे दोषी आढळल्याने त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले होते, तर ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय केकाण यांच्यावर खातेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.यवत ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराचे सदर प्रकरण तालुक्यात चांगलेच गाजले होते. मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार ग्रामपंचायतीमध्ये झाल्याच्या आरोपांमुळे त्यावेळचे सत्ताधारी व विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच संघर्ष झाला होता. मात्र, चौकशी मध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी दोषी आढळल्याने सत्ताधारी गटावर नामुष्की ओढावली होती.विभागीय आयुक्त, ग्रामविकास मंत्री व मुंबई उच्च न्यायलयात देखील या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दाद मागितली होती. मात्र, अखेरीस मुंबई उच्च न्यायालयानेदेखील ग्रामपंचायत निधीमध्ये आर्थिक अनियमितता व अपहार झाल्याचा ठपका संबंधितांवर ठेवला होता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्याने सरपंच शेंडगे यांना पदावरून बडतर्फच राहावे लागले होते. अखेर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतरदेखील याबाबतची चौकशी सुरु होती.(वार्ताहर)२०११-१२ वर्षातील घटना : लेखापरीक्षणात आढळली अनियमिततायवत ग्रामपंचायतीचे सन २०११-१२ मध्ये मा.सहायक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण झाले होते. त्याबाबत त्यांनी सदर आर्थिक वर्षात सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता, नियम बाह्यता, आर्थिक तफावत, बँक पासबुक व बँकेच्या ताळमेळ न घेतल्याने विशेष लेखापरीक्षणात वसूल पात्र रकमा, अनपेक्षित रकमा, लेखापरीक्षणात अमान्य रकमा घेतल्याचा अहवाल दिला आहे. त्याप्रमाणे गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांनी त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा लेखी आदेश विस्तार अधिकारी (पंचायत) यांना दिल्यानंतर त्यांनी काल (दि.११) रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सन २०११ - १२ या आर्थिक वर्षात यवत ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी म्हणून दत्तात्रय बाबूराव केकाण कार्यरत असल्याने त्यांनी दोघांनी मिळून ग्रामपंचायत निधीचा ८,१०,५७९/- रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून अपहार केल्याचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत.