शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दौैंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 02:24 IST

दौंडचे माजी आमदार तथा गावचे पाटील कृष्णराव ऊर्फ बाळासाहेब जगदाळे पाटील (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

दौंड : दौंडचे माजी आमदार तथा गावचे पाटील कृष्णराव ऊर्फ बाळासाहेब जगदाळे पाटील (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे, मुलगे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे, नगरसेवक इंद्रजित जगदाळे, सुना, तीन विवाहित मुली व नातवंडे, असा परिवार आहे. बाळासाहेब जगदाळे नेपाळच्या राणा घराण्यातील होते.कोल्हापूरला त्यांचे शिक्षण झाले. १९५४ मध्ये दौंड येथे जगदाळे परिवारात ते दत्तक म्हणून आले. दरम्यान, शरद पवारांचे कट्टरसमर्थक असल्याने त्यानुसार १९८० मध्ये एस काँग्रेसमधून ते आमदार झाले. कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले राज्यात पहिल्या दहा आमदारांत त्यांचा नामोल्लेख केला जातो. निष्कलंक, अजातशत्रू, स्पष्ट वक्ते, सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणे ही त्यांची ख्याती होती. पाटस (ता. दौैंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भीमा पाटस कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष होते. दौैंड तालुक्यातील शैैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी दौैंड महाविद्यालय सुरू केले.तालुक्याच्या पूर्व भागात आलेगाव परिसरात त्यांनी सहकारी तत्त्वावर दौैंड सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. परंतु शासनाच्या बदलत्या ध्येयधोरणानुसार या सहकारी कारखान्याचे रुपांतर दौैंड शुगरमध्ये झाले. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा, म्हणून त्यांनी बाळासाहेब जगदाळे पाटील या नावाने पतसंस्था उभारली. गावचे ग्रामदैैवत श्री काळभैैरवनाथ मंदिराच्या जीर्णाेद्धाराचा त्यांचा संकल्प होता. त्यानुसार मंदिरातील जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.