शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ब्रेमेन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर संघवीनगर येथे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चड्डा यांचे आईवडील दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन दवाखान्यात निघाले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अचानक त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीवरुन जाणाऱ्या चड्डा यांच्या आईच्या पायाला मार लागला. याबाबत त्यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. फिर्यादीच्या वडील आपली ह्दयशस्त्रक्रिया झाली असल्याचे त्यांना सांगत होते. तरीही जाधव यांनी त्यांच्या छातीत व पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या आईलाही लाथ मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे अधिक तपास करीत आहेत.