नीरा : माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भगिनी माधुरी सुभाष माने (रा.सांगली) या आपल्या कुटुंबासह पुण्याला निघाल्या होत्या. पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर नीरा -जेजुरी दरम्यान रस पिण्यासाठी त्या औदुंबर रसवंतीगृहात थांबल्या. रस घेतल्यानंतर त्या दागिने व पैसै असलेली बॅग विसरुन पुण्याला आल्या. मात्र, रसवंतीगृहात विसरलेली मौल्यवान वस्तूंची बॅग रसवंतीगृहांच्या चालकांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली. दागिने व पैसे असलेली बॅग स्वत: हुन परत करणाऱ्या व्यक्तीचे नाव शामराव धुमाळ आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. धुमाळ यांच्या सुमारे एक तासानंतर ही गोष्ट लक्षात आली. यानंतर त्यांनी ती बॅग तपासली असता त्यामध्ये दागिने, एटीएमकार्ड, आधारकार्ड, मोबाईल व पैसे आढळून आले. धुमाळ यांनी त्यांच्याशी संपर्क करून आमच्या इथे तुमची बॅग राहिली असल्याचे व ती सुरक्षित असल्याचे माने यांना सांगितले. आज सकाळी १० वाजता सुभाष माने यांनी ती बॅग ताब्यात घेतली. यावेळी पिंपरेचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद थोपटे, नीरा औट पोस्टचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब बनकर, निरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर,आदी उपस्थित होते. सुभाष माने यांनी धुमाळ यांचे आभार मानत त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
रसवंतीगृह चालकाकडून माजी मंत्र्यांच्या भगिनीला परत मिळाला लाखोंचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 20:39 IST
दागिने व पैसे असलेली बॅग स्वत: हुन परत करणाऱ्या व्यक्तीचे नाव शामराव धुमाळ आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.
रसवंतीगृह चालकाकडून माजी मंत्र्यांच्या भगिनीला परत मिळाला लाखोंचा ऐवज
ठळक मुद्दे बॅग तपासली असता त्यामध्ये दागिने, एटीएमकार्ड, आधारकार्ड, मोबाईल व पैसे आढळून आले.