शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
3
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
5
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
6
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
7
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
8
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
9
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
10
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
11
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
12
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
13
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
14
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
15
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
16
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
17
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
18
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
19
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
20
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात खंडणीचा गुन्हा (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून गळ्याला चाकू लावून राजीनामा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून गळ्याला चाकू लावून राजीनामा देण्यासाठी दबाव टाकून ५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३, रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात ९ डिसेंबरला फिर्याद दिली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ मध्ये कोथरूडमधील हॉटेल किमया येथे घडल्याने जळगाव जिल्ह्यातून हा गुन्हा कोथरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तानाजी केशव भोईटे, नीलेश रणजित भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, अलका संतोष पवार, सुषमा इंगळे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या गैरकारभारामुळे शासनाने त्यावर २०१२ मध्ये प्रशासक नेमला होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील, विजय पाटील व इतर १८ जण निवडून आले होते.

तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठीराख्यांचा पराभव झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये फिर्यादी पाटील यांच्या फिर्यादीनुसार नीलेश भोईटे यांचा फोन आला व त्यांनी संस्थेची जुनी कागदपत्रे देण्यासाठी पुण्यात बोलावले. तानाजी भोईटे यांना जळगावला येण्यास मनाई असल्याने पाटील यांना पुण्याला बोलावण्यात आले. पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भेटीत तानाजी भोईटे यांनी ‘ही संस्था गिरीशभाऊला हवी आहे़ आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे,’ असे सांगितले. पाटील व महेश पाटील यांनी त्यास नकार दिल्यावर भोईटे यांनी गिरीश महाजन यांना व्हॉटसअ‍ॅप कॉल लावला. महाजन यांनी ‘तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था नीलेशच्या ताब्यात देऊन विषय संपवून टाक’, असे सांगितले. त्याला पाटील यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना संस्थेचे रेकॉर्ड देण्यासाठी सदाशिव पेठेत घेऊन गेले. तेथे त्यांचे हातपाय बांधून मारहाण केली. गळ्याला चाकू लावून त्यांचे कपडे काढून डांबून ठेवले. सर्व संचालकाचे राजीनामे नाही आणले तर ‘एमपीडीए’च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. राजीनामे देण्यास नकार दिल्याने खंडणी स्वरूपात ५ लाख रुपये घेऊन संस्थेत कुऱ्हाडीसह प्रवेश करून तोडफोड करून संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खिशातील ५ हजार रुपये व दोन तोळ्यांची साखळी तोडून घेऊन गेले.

आरोपींनी फिर्यादी व इतरांना संस्थेत जाण्यापासून मज्जाव केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

------------

‘जानेवारी २०१८ मधील घटना;

तेव्हा दबाव; आता दिली फिर्याद

सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी सांगितले, आम्ही गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या गुन्ह्यात त्यांची भूमिका काय आहे, याची पडताळणी करून या संस्थेचे कार्यालय जळगाव येथे आहे. एफआयआरमध्ये नामांकित व्यक्तींकडून तोडफोड केली. पुणे शहरात केवळ अपहरण आणि धमकीची घटना घडली आहे. ही घटना जानेवारी २०१८ मध्ये घडली आहे. तक्रारदाराला गेल्या दोन वर्षांपासून भीती व दबाव होता आणि तो आता तक्रार देण्यासाठी पुढे आला आहे. पुणे पोलिसांना काल रात्री जळगाव पोलिसांकडून ही आठ पानी एफआयआर मिळाला आहे.