शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कारावर मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:04 IST

स्वप्निल कापुरे या माजी विद्यार्थ्याने मजदूरांवर चित्रित केलेल्या ‘थिय्या’ (अडडा) या लघुपटासाठी तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. यापूर्वी ‘भर दिवसा’ या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

ठळक मुद्देफटीआयआयच्या २०१६-१७ बॅचचा स्वप्निल कापुरे हा विद्यार्थी ६५ देशातील १८० इन्स्टिट्यूटचे सदस्यांकडून ही कलाकृती पाहिली जाते.

पुणे : ‘सायलेक्ट’(सेंटर इंटरनँशनल डी लिआसन देस इकोल्स डी सिनेमा एट डी टेलिव्हिजन)च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एफटीआयआयच्या स्वप्निल कापुरे या माजी विद्यार्थ्याने संपूर्ण देशभरातून सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. मजदूरांवर चित्रित केलेल्या ‘थिय्या’ (अडडा) या लघुपटासाठी तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. यापूर्वी ‘भर दिवसा’ या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.एफटीआयआयच्या २०१६-१७ बॅचचा स्वप्निल कापुरे हा विद्यार्थी आहे. विद्यार्थी दशेत असताना त्याने मजदुरांच्या जीवनाचे भीषण वास्तव मांडणारा ‘थिय्या’ या लघुपटाची निर्मिती केली होता. खासगी आणि सरकारी फिल्म स्कूलशी संलग्न असलेल्या ‘सायलेक्ट’ असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एफटीआयआय प्रशासनातर्फे हा लघुपट पाठविण्यात आला होता. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेल्या कलाकृतींची निवड ज्युरी सदस्यांकडून केली जात नाही, तर ६५ देशातील १८० इन्स्टिट्यूटचे सदस्यांकडून ही कलाकृती पाहिली जाते. त्यानंतर त्यातील उत्कृष्ट कलाकृतीसाठी मतदान केले जाते. संपूर्ण देशभरामध्ये केवळ एफटीआयआय, सत्यजित रे इन्स्टिट्यूट आणि व्हिसलिंग वूडस याा तीनच फिल्म इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय असोसिएशनशी संलग्न आहेत. यासंदर्भात स्वप्निल कापुरे याच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्याने व्यक्त केली. तो म्हणाला, आमचे घर बांधत असताना लहानपणी बाबा मोठ्या भावाला थिय्याला पाठवायचे आणि कुणी आहे का हे पाहायला सांगायचे मला तो थिय्या शब्द कळत नव्हता. मग पुण्यात आल्यानंतर डांगे चौकात मजदुरांची गर्दी दिसायची. त्यावर मग लघुपट करायचे ठरविले. घरातून बाहेर पडताना हाताला काम मिळेल का नाही हे त्या मजदूरांना माहिती नसते, या लघुपटामुळे त्यांचे जीवन जवळून अनुभवता आले. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे जबाबदारी खूप वाढली असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआय