शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ळ’ साठी माजी संमेलनाध्यक्षांचे पंतप्रधान माेदी यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 05:49 IST

आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी व या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र सरकारने कार्यालयीन भाषेमध्ये ‘ळ’ या वर्णाचा समावेश केला आहे. ‘ळ’ च्या वापराबाबत केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि डॉ. सदानंद मोरे या तीन माजी साहित्य संमेलनाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रामुळे २०१८ पासून ‘ळ’च्या वापरासाठी विविध पातळ्यांवर झगडत असलेल्या प्रकाश निर्मळ यांच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

केंद्र सरकारने आपल्या कार्यालयीन भाषेत अर्थात, प्रमाण हिंदीमध्ये हा वर्ण समाविष्ट केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या वर्णाच्या प्रत्यक्ष वापराची अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व मंत्रालये व रेल्वे, टपाल, बँका अशा ठिकाणी त्वरित व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नामकरण उर्दू आणि उत्तर प्रदेशी हिंदीत ‘तिलक’ असे झाले आहे. मात्र, हिंदी समुहाच्या विविध लोकभाषांमध्येच ‘ळ’ हा उच्चार असल्याने व केंद्र सरकारच्या कार्यालयीन हिंदीनेही तो आता त्यांच्या वर्णमालेत समाविष्ट केला असल्याने यापुढे त्यांचे नामकरण ‘तिलक’ असे करु नये, असे सुचवण्यात आले आहे.आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी व या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हिंदी समूहाच्या भाषांमध्ये ‘ळ’ या अक्षराचा समावेश असूनही त्याचा उच्चार ‘ल’ असाच केला जातो. यामध्ये बदल व्हावा यासाठी २०१८ पासून केंद्र शासन, राजभाषा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार सुरु होता. सेंट्रल हिंदी डायरेक्टोरेटने ‘ळ’ वापरात आणण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले. साहित्यिकांच्या पत्रामुळे या प्रक्रियेला गती मिळू शकेल. - प्रकाश निर्मळ

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी