शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर खाद्यपदार्थांचे ‘रोबोटिक’ दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:44 IST

देशांतर्गत विमानसेवा असलेल्या विमानतळावरील हे पहिलेच यांत्रिक दालन असल्याचा दावा विमानतळ प्रशासनाने केला आहे.

पुणे : लोहगाव विमानतळावर शुक्रवारपासून खाद्यपदार्थांचे रोबोटिक दालन खुले करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांकडून पैसे घेण्यापासून ते पदार्थ देण्यापर्यंतचे सर्व काम यंत्राद्वारेच केले जाणार आहे. देशांतर्गत विमानसेवा असलेल्या विमानतळावरील हे पहिलेच यांत्रिक दालन असल्याचा दावा विमानतळ प्रशासनाने केला आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक केशव शर्मा यांनी शुक्रवारी या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी विमानतळाचे संचालक अजय कुमार उपस्थित होते.अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर प्रवाशांच्या आवडीचे विविध खाद्यपदार्थ शहरातील विविध दर्जेदार विक्रेत्यांकडून तयार करून घेतले जाणार आहेत. त्यानंतर हे पदार्थ मशिनमध्ये ठेवले जातील. ग्राहकांना यंत्रासमोर असलेल्या आय पॅडवर आपल्याला हवे असलेले खाद्यपदार्थ निवडावे लागतील. हा आय पॅड यंत्राला जोडण्यात आला आहे. खाद्यपदार्थ निवडल्यानंतर त्यावर आलेली किंमत डेबिट, के्रडीट किंवा रोख स्वरुपात देता येईल.पैसे दिल्यानंतर यंत्राला असलेल्या रोबोटिक हातांद्वारे मायक्रोवेव ओव्हनमध्ये गरम केलेले खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळतील. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र ओव्हनची व्यवस्था आहे. या पदार्थांचे बील ग्राहकांना लगेचच मोबाईलवर पाठविले जाईल. ग्राहकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध होणार असल्याने त्यांना वेगळा अनुभव मिळेल, असे अजय कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणे