शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

संभाजीराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By admin | Updated: March 21, 2015 00:17 IST

धर्मवीर श्रीछत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोट गर्दी केली होती.

कोरेगाव भीमा : धर्मवीर श्रीछत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोट गर्दी केली होती. या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.४ वढू बुद्रुक ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. या वेळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमप, तहसीलदार रघुनाथ पोटे, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, सरपंच प्रफुल्ल शिवले, नगरसेवक महेंद्र पठारे, बाळासाहेब खैरे उपस्थित होते. ४या वेळी दरवर्षीप्रमाणे समाधिस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिलेल्या आदेशानुसार समाधिस्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंंदना दिली. या वेळी संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुक-तुळापूर’ असा पालखीसोहळा वढू बुद्रुक येथे आल्यानंतर, सरपंच प्रफुल्ल शिवले व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. ४पुष्पवृष्टीनंतर झालेल्या सभेस प.पू. १००८ महामंडलेश्वर शांतीगिरीमहाराज, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सुदर्शन वाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके, स्मृती समितीचे कार्यवाहक मिलिंद एकबोटे उपस्थित होते. स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार यावर्षी धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज शंभूसेवा पुरस्कार सुरेश चव्हाणके, शंभूभक्त डी. डी. भंडारे पुरस्कार बेळगाव श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर, शंभुभक्त अशोक भंडलकर पुरस्कार संतोष शिंदे, शंभुभक्त बाळासाहेब आरगडे पुरस्कार दत्ता सोनवणे, शंभुभक्त गेणू गणपत शिवले पुरस्कार वाल्मीक पोपट शिंदे व सहकारी, शंभुभक्त विवेक घाटपांडे पुरस्कार शिवप्रतिष्ठान सुरवसी (ता. फलटण, जि. सातारा), शंभुभक्त अरुण गायकवाड प्रशांत धनवडे व अक्षय दळवी (कोळशी, ता. फलटण, सातारा) यांना देण्यात आला . ४शिरूर-हवेली दिंंडीच्या वतीने तुळापूर ते वढू पालखी काढण्यात आली होती, तर तलवारबाजीचे प्रात्यक्षिकही या वेळी सादर करण्यात आले. या वेळी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या २६ घराण्यांच्या वंशजांनी रक्तदान करून राजांना अभिवादन केले. शंभुछत्रपतींची पालखी व अनेक ठिकाणाहून ज्योत तसेच दिंंड्या आणण्यात आल्या होत्या. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचच्या वतीने शंभुभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले.