मंचर : बनावट बियाणे व रोपांमुळे फ्लॉवर पिकांचे नुकसान झाले आहे. तोडणीस आल्यावर फ्लॉवरचा कांदा गुलाबी रंगाचा निघत आहे. हे पिक वाया गेल्याने शेतात जनावरे सोडण्याची वेळ वाळुंजवाडी (ता. आंबोगाव) येथील शेतकऱ्यांवर आली आहे. या प्रकरणी येथील शेतकरी वसंत निघोट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.निघोट यांनी दोन एकर शेतात फ्लॉवर पिकाची लागवड केली. त्यासाठी रोपवाटिकेतून रोपे आणण्यात आली. रोपखरेदीसाठी साडेसतरा हजार रुपये मोजावे लागले. ट्रॅक्टरने मशागत केली. रासायनिक व सेंद्रिय खताचा वापर करावा लागला. तीन ट्रॉली शेणखत तसेच ठिबक सिंचन केल्यामुळे भांडवली खर्चात वाढ झाली. महागडी औषधफवारणी निघोट यांना करावी लागली. चांगली मशागत केल्याने फ्लॉवर पीक जोमदार आले होते. शेतात हे पीक एकसारखे आले होते. निघोट यांना मजुरी जादा मोजावी लागली आहे.फ्लॉवर पीक तोडणीस आल्यानंतर बनावट बियाण्याचा प्रकार लक्षात आला. फ्लॉवरचा गड्डा सफेदऐवजी गुलाबी रंगाचा असल्याचे दिसून आले. सुरुवातीस एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असावा, असे शेतकरी वसंत निघोट यांना वाटले.
बनावट बियाण्यामुळे फ्लॉवरचे नुकसान
By admin | Updated: December 23, 2016 00:02 IST