शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उजनी काठोकाठ भरल्याने फ्लेमिंगोनी फिरवली पाठ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : यंदा हवामानात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे भिगवण परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असून, फ्लेमिंगोची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : यंदा हवामानात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे भिगवण परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असून, फ्लेमिंगोची प्रतीक्षा करावी लागत आहे. राजहंस, चक्रवाक आणि अन्य स्थानिक पक्ष्यांचे मात्र सहज दर्शन होत आहे. यंदाच्या दमदार आणि दिवाळीपर्यंत लांबलेल्या पावसामुळे उजनी धरण काठोकाठ भरले आहे. परिणामी पाणथळ जागा आणि त्या भोवती तयार होणारा पक्ष्यांसाठीचा अनुकूल अधिवास यंदा नाही. परिणामी फ्लेमिंगो अद्याप आलेले नाहीत. पाणी पातळी कमी झाल्यास जानेवारीअखेरपर्यंत त्यांचे आगमन होऊ शकते, अशी शक्यता पक्षीतज्ज्ञांनी वर्तविली.

‘अन्नासाठी दाही दिशा, आम्हां फिरविसी जगदिशा’ या उक्तीप्रमाणे फ्लेमिंगो वर्षातून दोनदा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात. उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात आणि दक्षिणेकडून पुन्हा उत्तरेकडे हे पक्षी स्थलांतर करतात. या पक्ष्यांची असामान्य दृष्टी स्थलांतर करताना उपयोगी ठरते.

जमिनीवरील वैशिष्ट्यपूर्ण चिन्हे दिसावीत म्हणून फ्लेमिंगो अतिउंचावर उडावे लागते. विशेषत: समुद्र ओलांडत असताना उंचीवरुन उडणे त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरते. रात्री आकाशातून प्रवास करणारे पक्षी ग्रह-नक्षत्रांचा मागोवा घेत संचार करतात, असा सिद्धांत जर्मन पक्षिशास्त्रज्ञ ई. एफ. जी. सावर यांनी मांडला आहे. पक्षी आकाशातील ग्रहगोलांना अनुसरून रात्री स्थलांतर करतात. एरवी भूतलावरील चिन्हे अंधारात दिसणे अशक्यच असते. पक्षी आपल्या इच्छित स्थानी कसे पोचतात याचा उलगडा अद्यापही नेमकेपणाने झालेला नसल्याचे निरिक्षण अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी त्यांच्या ‘पक्षीकोशा’त नमूद केले आहे.

चौकट

...म्हणून पक्ष्यांचे आगमन कमी

यंदा पाऊस लांबला. त्यामुळे जलाशयाभोवतालची अन्नसाखळी तयार होण्यास कालावधी लागणार आहे. तापमान, वाऱ्याची दिशा आणि लहरींचे अचूक ज्ञान पक्ष्यांना असते. त्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्येच तज्ज्ञांनी अंदाज वर्तविला होता की, स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबणार आहे. त्यानुसार अजूनतरी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमीच आहे.

चौकट

दिवसाला----------हजार किमीचा प्रवास

राजहंस हा दिवसाला -------- हजार किलोमीटर प्रवास करू शकतो आणि ताशी वेग -------- किलोमीटर असते. सुमारे ८ हजार मीटर उंचावरून ते उडत पुण्याकडे येतात. तिबेट, कझाकिस्तान, रशिया, मंगोलिया या देशांमधून राजहंस भारतात येतात.

चौकट

राजहंस, चक्रवाक, फ्लेमिंगो साधारणपणे ऑक्टोबर-नोंव्हेबरमध्ये पुणे परिसरात येतात. यंदा पाऊस खूप झाल्याने उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्षी अजून आले नाहीत. त्यांना पाणथळ (दलदल) जागा लागते. पण अजून तशी जागा भिगवणला निर्माण झालेली नाही. हवामानाचा अंदाज त्यांना असतो. हिमालय ओलांडून ते आपल्याकडे येतात. उडण्याची प्रचंड क्षमता असणारे हे पक्षी एव्हरेस्टवरून उडत येतात. त्या पर्वतावर ऑक्सिजन विरळ असतो तरी ते सहज येतात. यावरून या पक्ष्यांचे वैशिष्ट्य समजून येते.

- धर्मराज पाटील, पक्षी अभ्यासक