शिरूर शहरात ७१ वा प्रजासत्ताक दिन
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिरूर तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार
लैला शेख यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
शिरूर तहसीलदार कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त तहसीलदार लाला शेख यांच्या हस्ते करण्यात आले. शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन करण्यात आले.
शिरूर नगर परिषदेचे ध्वजारोहण नगराध्यक्ष वैशाली वाखारे व सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शिरूर येथील हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. शिरूर नगर परिषद शाळा यांच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.
शिरूर पोलीस स्टेशन येथील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या हस्ते, सिटी बोरा कॉलेज येथील ध्वजारोहण अध्यक्ष प्रकाश भाऊ धारिवाल यांच्या हस्ते, शिरूर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक तुषार पाटील यांच्या हस्ते, शिरूर पंचायत समिती येथील ध्वजारोहण सभापती मोनिकाताई हरगुडे यांच्या हस्ते, वनविभाग कार्यालय येथे परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आजाद सोशल फाउंडेशन, हलवाई चौक मित्र मंडळ, शिवसेना शाखा क्रमांक 2 यासह शहरातील विविध संस्था-संघटनांनी मंडळांनी ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. शिरूर हुतात्मा स्मारक येथे जैन स्थानक येथे पन्नास वर्षे सेवा करणारे बबन भाऊ यादव व त्यांची पत्नी पारुबाई यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
तहसीलदार कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमास शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल, पंचायत समिती सभापती मोनिकाताई हरगुडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव , श्रीशैल वट्टे, भूमी लेखाधिकारी ठाकरे, संघपती भरत चोरडिया, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, संजय बारवकर,नगरसेविका, नगरसेवक, माजी सैनिक व मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक उपस्थित होते.