लोणी काळभोर : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या एकाची पावणेपाच तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी पळवून नेली. ही घटना कदमवाकस्ती परिसरात घडली. गजानन अशोक पवार (वय २२, रा. केडगाव, चौफुला, हॉटेल सम्राटचे मागे) यांनी फिर्याद दिली. सोळा जून रोजी ते आपला मित्र संतोष भाऊसाहेब थोरात यांचेसमवेत पुणे येथे आले होते. काम झाल्यानंतर ते दोघे घरी परतत असताना भूक लागली म्हणून कदमवाकवस्ती परिसरातील हॉटेल जयभवानी लंच होम येथे जेवणासाठी थांबले.जेवण करीत असताना पवार यांनी आपल्याजवळील २२ हजार ५00 रुपये किमतीचे दीड तोळा वजनाची बदाम असलेली चेन, १५ हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे मंगळसूत्र, ३३ हजार ५00 रुपये किमतीचे सव्वादोन तोळा वजन असलेले एक नेकलेस, असा एकून ७० हजारांचा पावणेपाच तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज असलेली पिशवी टेबलवर ठेवली होती.जेवण झाल्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पवार आपले मित्र थोरात यांचेसमवेत हॉटेलबाहेर आले. त्या वेळी पिशवी टेबलवर राहिल्याचे लक्षात आल्याने ते तातडीने आत गेले, परंतु पिशवी मिळून आली नाही. (वार्ताहर)
पाच तोळे दागिन्यांची पिशवी लंपास
By admin | Updated: June 19, 2014 05:22 IST