शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 08:45 IST

भोजनगृहात वारंवार आळ्या निघत असल्यामुळे विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात आले होते.

पुणे : भोजनगृहात वारंवार आळ्या निघत असल्यामुळे विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी पुणे न्यायालयात कुलगुरु नितीन करमळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कुलगुरू आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश चतु:श्रृगी पोलिसांना दिले होते. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुसह पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कुलगुरु नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षा रक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत (सर्व रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी आकाश भीमराव भोसले (वय २५, रा. कार्टी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ एप्रिल २०१९ चे पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडला होता. याबाबतची माहिती अशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावर कारवाई करण्याऐवजी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतु :श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांसह बारा विद्यार्थ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांवर अन्यायकारकपणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून बोलले जात होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला विद्यार्थी आकाश भोसले आणि इतरांनी याविरोधात पुणे न्यायालयामध्ये धाव घेतली.याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान या सर्वांवर अ‍ॅट्रॉसिटी कायदा व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री उशिरा कुलगुरुंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.