शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांकडून घेतले पाच लाख; महापालिकेत वर्ग करण्यासाठी गैैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 04:44 IST

सोळा शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यासाठी काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रती शिक्षक पाच लाख रुपये घेतले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

पिंपरी : सोळा शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यासाठी काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रती शिक्षक पाच लाख रुपये घेतले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सीईटी’ परीक्षेत २०१० मध्ये पात्र ठरलेल्या प्राथमिक विभागातील १८ शिक्षकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश होता. त्यानुसार शिक्षण संचालकांच्या प्राथमिक विभागाने १८ शिक्षक महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग केले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांच्या नावे नोव्हेंबर २०१६ मध्ये पत्र आले होते. त्या वेळच्या शिक्षण मंडळाने या शिक्षकांना हजर करून घेण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता.शिक्षकांचे ‘रोस्टर’ तपासले नाही असे कारण देत प्रशासनाने हे शिक्षक हजर करून घेण्यास दिरंगाई केली. परंतु, तत्कालीन पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ बोलणी फिस्कटल्याने त्या शिक्षकांना हजर करून घेण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे. दरम्यान, विलंब होत असल्याने हे शिक्षक पुन्हा न्यायालायात गेले. त्यानंतर महापालिकेत सत्तांतर होत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली.- महापालिकेत वर्ग करून घेण्यासाठी शिक्षकांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादीची सत्ता जाऊन महापालिकेत भाजपाची सत्ता आली. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये १८ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांना हजर करून घेतले. यामध्ये प्रती शिक्षक ५ लाख रुपये घेत भाजपा पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाºयांनी आपले हात ओले करून घेतले असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड