शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

सिंहगड विजयाचा त्रिशतकोत्तर रौप्यमहोत्सव उद्या

By admin | Updated: June 30, 2017 03:53 IST

छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सिंहगडावर पुन्हा एकदा नरवीर तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच शौर्यपतका फडकावणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सिंहगडावर पुन्हा एकदा नरवीर तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच शौर्यपतका फडकावणाऱ्या नरवीर नावजी बलकवडे यांच्या सिंहगड विजयाचा त्रिशतकोत्तर रौप्यमहोत्सव १ व २ जुलै रोजी साजरा करण्यात येत आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांना यावेळी पुरस्कार देण्यात येणार आहे.ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडूरंग बलकवडे यांनी ही माहिती दिली. नरवीर नावजी बलकवडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात अनेक किल्ल्यांवर विजय पताका रोवली. त्याच मोहिमेत १ जुलै १६९३ रोजी पराक्रमाची शर्थ करून त्यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला. खुद्द छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीहून पत्र पाठवून त्यांचे यासाठी कौतुक केले. यावेळी ३२५ वर्षांनंतर या दिवसाची तारीख तिथी एकाच दिवशी आली आहे.नावजी यांच्या स्मरणार्थ नरवीर नावजी बलकवडे स्मृती समिती स्थापन करण्यात आली असून समिती व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने १ जुलै रोजी (शनिवार) सकाळी ९ वाजता सिंहगड येथे पुणे दरवाजाजवळ विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. गडावरील सर्व देवतांचे तसेच राजाराम महाराज, तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. अजितराव आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. रविवारी (२ जुलै) सायंकाळी ६ वाजता वीर बाजी पासलकर स्मारक सिंहगड रस्ता येथे उमराणीकर यांना प्रसिद्ध व्यंगत्रिकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते नावजी बलकवडे शौर्य पुरस्कराचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे असतील.