शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘आरएसएस’ची आजपासून पाचदिवसीय चिंतन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:50 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची पाच दिवसीय चिंतन बैठक मंगळवारपासून मुळशी तालुक्यातील कोळवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची पाच दिवसीय चिंतन बैठक मंगळवारपासून मुळशी तालुक्यातील कोळवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे.संघाचे अखिल भारतीय सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार उपस्थित होते. वैद्य म्हणाले, दि. १७ ते २१ एप्रिल या कालावधीत ही बैठक होत आहे. बैठकीमध्ये केवळ संघकार्य, विस्तार, हिंदुत्व यांंसह समाजात सध्या घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा केली जाणार आहे. आगामी निवडणुकांवर कसलीही चर्चा होणार नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले नाही. सरसंघचालक या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, प्रवीण तोगडिया यांचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी विश्व हिंदू परिषद सोडली आहे. मात्र, तरीही संघाचा त्यांच्याशी नियमितपणे संपर्क राहील, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन काही विघटनकारी शक्ती समाजात जातीभेदाच्या भिंती उभ्या करत आहेत. डॉ. आंबेडकरांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी काम केले. त्यांचे विचार भेदाची भिंत उभी करणारे नव्हते. संघही तेच करत आहे. जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आंबेडकरांचे खरे अनुयायी असू शकत नाहीत, असेही वैद्य म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ