शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून 3 लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 19:01 IST

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे.

पुणे : प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे. याच प्रकारची कारवाई पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहअायुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले. 

    शनिवारपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येत अाहे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर साेपविण्यात अाली अाहे. शनिवारी सकाळपासूनच पुणे महानगरपालिकेने विविध क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून त्या भागात कारवाई करण्यास सुरुवात केली. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याचे सांगत काही व्यापाऱ्यांनी या कारवाई विराेधात नाराजी व्यक्त केली. तर नागरिकांनी या प्लास्टिक बंदीचे मनापासून स्वागत केले. शनिवारी नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांएेवजी कापडी विशव्या घेऊन घराबाहेर पडल्याचे चित्र हाेते. अनेक व्यापाऱ्यांनीही बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू अापल्या दुकानांमध्ये ठेवल्या नाहीत. अनेकांनी कापडी पिशव्यांमध्ये सामान ग्राहकांना देण्यावर भर दिला. 

    पुण्यातील 15 क्षेत्रिय कार्यालयांअतर्गत करण्यात अालेल्या कारवाईत 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल करण्यात अाला. या कारवाईतून 8 हजार सातशे 11 किलाे इतके प्लास्टिक तर 75 किलाे थर्माकाेल जप्त करण्यात अाले. एकूण 73 जणांवर कारवाई करण्यात अाली. यात दुकानदार, बेकरीचालक अश्या विविध दुकानांवर कारवाई करण्यात अाली. या प्लास्टिक बंदीबाबत बाेलताना किराणा व भूसार मालाचे व्यावसायिक पारस परमार म्हणाले, प्लास्टिक बंदीचा निर्णय हा स्वागतार्ह अाहे. परंतु ही प्लास्टिक बंदी केल्यावर प्लास्टिक वस्तूंना पर्याय काय, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता अाहे. या बंदीमुळे छाेटा व्यापारी ताेट्यात जाणार अाहे. ब्रॅण्डेड वस्तूसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या अावरणाला बंदी घालण्यात अाली नाही, मात्र छाेट्या व्यापाऱ्यांकडून वस्तू  पॅक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अावरणाला बंदी घालण्यात येत अाहे. ब्रॅण्डच्या नावाखाली छाेट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे काम सरकार करीत अाहे. 

    दरम्यान यापुढेही प्लास्टिक बंदीची कारवाई अशीच चालू ठेवणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPlastic banप्लॅस्टिक बंदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या