शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शंभर वर्षांत पहिल्यांदाच अकरा सर्परूपी सोमनाथांचे दर्शन

By admin | Updated: April 25, 2017 03:59 IST

: करंजे (ता. बारामती) येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी शंभर वर्षांत पहिल्यांदाच एकाच वेळी एकरूपी तब्बल अकरा

सोमेश्वरनगर : करंजे (ता. बारामती) येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी शंभर वर्षांत पहिल्यांदाच एकाच वेळी एकरूपी तब्बल अकरा सर्परूपी सोमनाथांनी भाविकांना दर्शन दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथांनी दर्शन दिल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने शेकडो भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली. सोमायाचे करंजे हे प्रसिद्ध देवस्थान असून दरवर्षी श्रावण महिन्यात या ठिकाणी यात्रा भरते. या वेळी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यानंतर वर्षातील दर सोमवारी या ठिकाणी बारामती तालुक्यासह जिल्हाभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. सोमवारी (दि. २४) असल्याने शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी आठ वाजता सोमेश्वरनगर परिसरातील एकाच ठिकाणी एकसारखी दिसणारी सर्परूपी सोमनाथाने दर्शन दिले. हे सर्व सर्परूपी सोमनाथ सकाळपासूनच दर्शनासाठी आणून ठेवण्यात आले. एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथाने दर्शन दिल्याचे समजताच भाविक दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे धावू लागले. गेल्या शंभर वर्षांत एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथांनी दर्शन दिले नसल्याने अनेक ज्येष्ठ भाविकांनी सांगितले. श्रावण महिन्यातदेखील चार ते पाचच सर्परूपी सोमनाथ दर्शन देतात, असे अनेकांनी सांगितले. मात्र, एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथांनी दर्शन देण्याची पहिलीच वेळ असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष रामदास भांडवलकर व सचिव हेमंत भांडवलकर यांनी सांगितले.