शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

आधी गोळ्या घाला, मगच सर्वेक्षण करा

By admin | Updated: December 31, 2016 05:29 IST

आम्ही आमच्या गावात सुखाने गुण्यागोविंदाने राहत असून, अर्धीभाकरी खाऊन खूश आहोत साहेब. विमानतळाच्या अगोदर आम्हाला गोळ्या घाला आणि नंतरच विमानतळ

राजेवाडी : आम्ही आमच्या गावात सुखाने गुण्यागोविंदाने राहत असून, अर्धीभाकरी खाऊन खूश आहोत साहेब. विमानतळाच्या अगोदर आम्हाला गोळ्या घाला आणि नंतरच विमानतळ करा, असे पारगाव येथील अनिता रोकडे यांनी विमानतळविरोधी भूमिका आक्रमकपणे पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांच्यापुढे मांडली.विमानतळाचे अजून सहा आठवडे सूक्ष्म सर्वेक्षण होणार असून शेतकऱ्यांनी विरोध करू नये, यासाठी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी जेजुरी व सासवड येथील पोलीस बंदोबस्तात पारगाव येथे आले होते.या वेळी तहसीलदार सचिन गिरी यांनी विमानतळासाठी वाऱ्याचा वेग, हवेचा दाब, टेकड्या, डोंगर, गावठाण यांचे सूक्ष्म सर्वेक्षण दीड महिना होणार आहे. विरोध करू नका, सर्वेक्षणात वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण या गावांचा समावेश करण्यात आला आहे. चाकणमधील नागरिकांची विमानतळाची मागणी होत आहे, त्यामुळे पुरंदरमधील शेतकऱ्यांनी विमानतळास विरोध करू नका, असे आवाहन तहसीलदार सचिन गिरी यांनी केल्यानंतर चाकणलाच विमानतळ जाऊ द्या, अशी मागणी सर्वांनी केली.या वेळी गणेश मेमाणे, मंडलाधिकारी संजय बडदे, पोलीस निरीक्षक गौड, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, वसंत मेमाणे, विठ्ठल मेमाणे, हरिभाऊ मेमाणे, अनिल मेमाणे, माजी सरपंच जितेंद्र मेमाणे, अनिता रोकडे, विलास कडलग, शिवाजी मेमाणे, दीपक मेमाणे, पोपट मेमाणे यांनी विमानतळविरोधी आक्रमक भूमिका मांडली. आजची वस्तुस्थिती शासनस्तरावर आजच पोहोचवणार असल्याचे तहसीलदार सचिन गिरी यांनी सांगितल्यानंतर बैठक संपली. (वार्ताहर)- आमच्या भागात पुरंदर उपसाच्या पाण्याने शेती फळबागा फुलल्या आहेत. आम्हाला विमानतळाची गरज नाही. मंत्र्याला विमानाची गरज आहे, विमानतळ मंत्र्यांच्या वीर परिंचे भागात करा, अशी नंदा टिळेकर यांनी भूमिका मांडली. सर्वेक्षण करायला येऊ नका, आल्यास आम्ही सामुदायिक आत्मदहन करू, असा इशारा सुगंधा खेडेकर यांनी दिला.विमानतळास इंचभर जमीन देणार नसल्याचे अनेक वेळा लेखी कळवले असून, आमची भूमिका ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक व एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे अधिकारी यांना गावात बोलावल्याशिवाय आम्ही सर्वेक्षण होऊ देणार नाही.- सर्जेराव मेमाणे, सरपंच (पारगाव)