शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली रिंगरोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:29 IST

शहराच्या वाहतूककोंडीवर व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे रिंगरोडचे काम लवकरच सुरू होणार असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली असा ३३ किमी लांबीचा रिंगरोड

पुणे : शहराच्या वाहतूककोंडीवर व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे रिंगरोडचे काम लवकरच सुरू होणार असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली असा ३३ किमी लांबीचा रिंगरोड विकसित करणार आहे. प्राधिकरणाने रिंगरोडच्या कामासाठी निविदा मागविली होती. यावर तीन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्याचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. रिंगरोडच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्ष काम एप्रिलमध्ये सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी रिंगरोड हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. एकूण १२८.६६ किमी लांबीचा हा रिंगरोड असणार आहे. या रिंगरोडसाठी टीपी स्कीमचे मॉडेल राबविले जाणार आहे. हा रिंगरोड १० पदरी असणार आहे. प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग जोडणारा रिंगरोड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आंबेगाव खुर्द ते वाघोली हा ३३ किमी लांबीचा रिंगरोड केला जाणार आहे. या रिंगरोडसाठी १२ किमी जागेचा ताबा प्राधिकरणाला मिळाला आहे.प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले, की रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या निविदांचे आर्थिक आणि तांत्रिक बाबींवर मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे.भारतमाला या प्रकल्पामध्ये प्राधिकरणाच्या रिंगरोडचा समावेश करण्यात आला आहे. ‘हायब्रीड मॉडेल’नुसार रिंगरोडचे काम केले जाणार आहे. या १२८.६६ किमी लांबीच्या रिंगरोडसाठी एकूण १३ हजार ५०० कोटींची आवश्यकता आहे. आंबेगाव खुर्द ते वाघोलीदरम्यानच्या मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. यासाठी प्राधिकरणाने २ हजार ४६८ कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.केंद्र शासनाचे २ हजार ४६८ कोटी आणि प्राधिकरणाचे ३३० कोटी असा एकूण २२ हजार ७९० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील सुमारे ३३ किमी लांबीच्या रिंगरोडमधील १० लेनपैकी ८ लेन या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) निधीतून करण्यात येणार आहे, तर सर्व्हिस रोडच्या दोन लेन या प्राधिकरणाच्या निधीतून करण्यात येणार आहेत.