शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटातला पहिला गुरू ‘समर’

By admin | Updated: May 9, 2016 01:04 IST

नाटकाचा माझा पिंड. ‘सामना’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी चालून आली आणि पाय काहीसे लटपटले... चित्र तर समोर दिसत होते; पण कॅमेऱ्याचे तंत्र अवगत नव्हते.

पुणे : नाटकाचा माझा पिंड. ‘सामना’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी चालून आली आणि पाय काहीसे लटपटले... चित्र तर समोर दिसत होते; पण कॅमेऱ्याचे तंत्र अवगत नव्हते... पण दहा दिवसांत त्याने मला चित्रपट कसा करायचा हे शिकविले... आणि दिग्दर्शनातील पहिल्याच चित्रपटाची बर्लिन महोत्सवात निवड झाली... चित्रपटातला माझा पहिला गुरू कुणी असेल तर समर नखाते’...हे बोल आहेत त्यांचे शिष्य प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे. आशय फिल्म क्लबच्या वतीने यंदापासून देण्यात येणारा ‘पी. के. नायर स्मृती सन्मान’ ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते यांना डॉ. पटेल यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. पटेल यांनी नखाते यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. या वेळी आशयचे सचिव सतीश जकातदार व वीरेंद्र चित्राव याप्रसंगी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना चित्रपटाचा बायोस्कोप अशी ख्याती असलेल्या समर नखाते यांनी चित्रपटाचे अवकाश उलगडले. नायर यांनी माझ्या जगण्याची दालने समृद्ध केली. आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जे समोर येत आहे ते जिवंत आहे की मृत, हेच कळणे कठीण झाले आहे. त्याच्याशी आपण एकरूप झालो आहोत का? हेच आता पुढच्या पिढीने जाणून घेण्याची गरज आहे. चित्रपट ही लोकशाही कला आहे. कुंपणे आपण निर्माण केली आहेत. त्यामध्ये खरे तर मोकळेपणा हवा. नाहीतर गोंधळ उडेल. वेगवेगळे कप्पे नको आहेत. जीवन प्रवाही राहायला हवे आणि कलाही. चित्रपटाने माणसाला सजग केले आहे. तेच करूयात आणि चांगला चित्रपट काढूयात... असे आश्वासक चित्र त्यांनी नवीन पिढीसमोर निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले. (प्रतिनिधी)