शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तिहेरी तलाकप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 18:26 IST

केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा केल्यानंतर पुण्यातील पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पुणे : केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा केल्यानंतर पुण्यातील पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पतीने पत्नीला नोटीस पाठवून त्यामध्ये तीन वेळा तलाक तलाक तलाक असा उल्लेख केला होता. याप्रकरणी मांजरी येथे राहणा-या २९ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली असून, हडपसर पोलिसांनी जावेद नासीर शेख (रा. गुलमोहर कॉलनी, हडपसर स्टेशनजवळ, मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेचा जावेदबरोबर जानेवारी २०१८ मध्ये विवाह झाला होता. तिने पती व सासरच्या लोकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१८ मध्ये तक्रार केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या तक्रारीनंतर फिर्यादी मांजरी येथे माहेरी रहात आहे. जावेद हा अमेनोरा येथे खासगी कंपनीत स्टोअर मॅनेजर आहे. जावेद शेख याने ९ ऑक्टोबर रोजी तिला एक नोटीस पाठविली. त्यात मै जावेद नासीर शेख तुमको तलाक देता हू असा तीन वेळा उच्चार करून विवाह संपुष्टात आणला आहे. हडपसर पोलिसांनी अ‍ॅवॉलिशन ऑफ ट्रिपल तलाक अंडर द मुस्लिम वूमन प्रोटेक्शन ऑफ मँरेज अ‍ॅक्ट २०१९ च्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहे.