शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक कर्मचारी सुरक्षित, सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:54 IST

तळवडेतील केंद्र : सीमाभिंतीसह अद्ययावत कक्ष होणार उपलब्ध

तळवडे : येथील सॉफ्टवेअर पार्क चौकात जकात नाक्याच्या शेडमध्ये दोन वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात अग्निशामक केंद्राची उभारणी करण्यात आली होती. पुरेशा सुविधा नसल्यामुळे अग्निशामक केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले होते. या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार येथे सीमाभिंत उभारण्यात येत असून, कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत कक्ष उभारण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे.

तळवडे येथील अग्निशामक केंद्राला सीमाभिंत, कार्यालय, कर्मचारी खोली उभारणीचे काम सुरू करण्यात आले. नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, अग्निशामक विभागाचे उप अधिकारी ज्ञानेश्वर भालेकर, रवींद्र सोनवणे या वेळी उपस्थित होते. अग्निशामक केंद्रालगत वनीकरण आहे. केंद्राला सीमाभिंत नसल्याने सरपटणारे प्राणी, भटकी कुत्री तसेच इतर प्राण्यांचा उपद्रव होत होता. लवकरच या समस्या सुटणार आहेत.तळवडे येथे मोठ्या प्रमाणात लघुउद्योगांचे जाळे उभारले जात आहे. नागरीकरण वाढत आहे. या परिसरात सॉफ्टवेअर चौकात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या अग्निशामक केंद्रामुळे वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु रात्री-अपरात्री या ठिकाणी सरपटणारे प्राणी येत असल्याने कर्मचाºयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु यावर तोडगा काढून महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी अग्निशामक केंद्राची उभारणी करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.त्यामुळे कर्मचाºयांच्या समस्या सुटणार आहेत.- प्रवीण भालेकर, नगरसेवकदोन वर्षांपूर्वी तळवडे येथे अग्निशामक केंद्राची महापालिकेतर्फे उभारणी करण्यात आली. आपत्तीच्या वेळी या केंद्राच्या माध्यमातून मोलाची मदत झाली आहे. या केंद्राच्या सीमाभिंत उभारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. इतर पायाभूत सुविधाही महापालिकेतर्फे पुरविल्या जाणार आहेत.- पंकज भालेकर, नगरसेवक 

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल