पाटस : येथील बारामती फाटा येथे भंगाराच्या गोडाऊनला अचानक आग लागून भंगारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दुपारी साडेचारच्या सुमाराला आग लागली. आग नेमकी कशाने लागली, हे समजू शकले नाही. धूराने अवघा परिसर काळोखमय झाला होता. आग विझविण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ धावून गेले. तसेच टोलनाक्यावरील कर्मचारी, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विझविण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी आला. आगीचे स्वरूप भयानक असल्याने साधारणत: आग विझविण्यासाठी तीन अग्निशामक बंब लागले. त्यानंतर साधारणत: दीड ते दोन तासाने आग आटोक्यात आली. भंगारच्या गोडाऊनमध्ये असलेले केमिकलयुक्त पुठ्ठे आणि प्लॅस्टिकचे भंगार जळून खाक झाले आहे.
पाटसला भंगाराच्या गोडाऊनला आग
By admin | Updated: March 25, 2017 03:33 IST