शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल

By admin | Updated: June 21, 2015 00:27 IST

म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन पिंपरी न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले.

पिंपरी : म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन पिंपरी न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी कार्यवाहीचे आदेश दिले. न्यायालयाची प्रत प्राप्त होताच, संत तुकारामनगर पोलीस चौकीत सहायक पोलीस निरीक्षक मट्टामी यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. म्हाडाच्या संत तुकारामनगर येथील गृहसंकुल योजनेत अर्ज केला. सदनिकेची सोडत लागली असताना, अर्ज रद्द करून ती सदनिका दुसऱ्यास देण्याची प्रक्रिया केली. त्यास आक्षेप घेणारा अर्ज प्रवीण बाबूराव सूर्यवंशी यांनी पिंपरी न्यायालयात दाखल केला होता. त्या अर्जाची दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. म्हाडाने २०१०मध्ये संत तुकारामनगर येथे बांधलेल्या बैठ्या घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागविले. अर्जदारांकडून सदनिकेच्या एकूण किमतीपैकी दहा टक्के रक्कम जमा करून घेतली. त्यानंतर सोडत काढली. सोडत काढून सदनिकांचे वितरण करण्याचे निश्चित झाले. प्रवीण सूर्यवंशी यांनी २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा धनादेश म्हाडाच्या कार्यालयाकडे जमा केला. उर्वरित रक्कम बँकेतून कर्ज स्वरूपात घेऊन भरावयाची तयारी केली असताना, म्हाडाने तुमच्या नावे अन्य ठिकाणी सदनिका असल्याने तुमचा अर्ज रद्द केला असल्याचे कळविले. याबद्दल सूर्यवंशी यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन १७ जूनला पिंपरी न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६(३) नुसार हे प्रकरण पिंपरी पोलिसांकडे पाठविले. संत तुकारामनगर पोलीस चौकीत या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला असल्याचे सांगितले.दरम्यान, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी कसलाही गुन्हा दाखल नसल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे. प्रवीण सूर्यवंशी यांनी म्हाडाविरोधात मनाईसाठी दावा दाखल केला आहे. या दिवाणी दाव्यातील सूर्यवंशी यांचा मनाईचा अर्ज ४ फेब्रुवारी २०१४ला पिंपरी दिवाणी न्यायालयाने रद्द केला आहे. हा अर्ज रद्द केल्याने सूर्यवंशी यांनी दिवाणी न्यायालय पुणे येथे अर्ज केला असून, त्याची सुनावणी २९ जूनला होणार आहे, असे म्हाडाचे तत्कालिन मुख्याधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)