शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनो सावधान! गणवेश परिधान न केल्यास ५०० रुपयांचा दंड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 18:20 IST

जे कर्मचारी गणवेश परिधान करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार ..

ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी घेतला निर्णय

पुणे : महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. यापुढे जे कर्मचारी गणवेश परिधान करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये याविषयी निर्णय घेण्यात आला.

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेने गणवेश दिलेले आहेत. सर्वजणांना खाकी रंगाचे गणवेश देण्यात आलेले आहेत. या गणवेशावर पालिकेचे मानचिन्ह (लोहो) ही छापण्यात आलेले आहे. परंतू, पालिकेचे पुरुष-स्त्री कर्मचारी त्यांना देण्यात आलेले गणवेश परिधान करीत नाहीत. दैनंदिन वापराच्या कपड्यांवरच ते साफ-सफाईची कामे करीत असल्याचे चित्र आहे. यासोबतच कचरा संकलन करणाऱ्या गाड्या, घंटा गाड्या, रस्ते झाडणारे,ड्रेनेज स्वच्छता आदी कामे करणारे पालिकेचे कर्मचारी गणवेश घालत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये समोर आले आहे.सध्या फक्त स्वच्छ संस्थेचे कर्मचारी त्यांचे अ‍ॅप्रन व ओळखपत्र परिधान करुन काम करतात. अशाच प्रकारे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. जेणेकरुन अधिकारी व नागरिकांनाही पालिकेचे कर्मचारी कोण आहेत याची ओळख पटेल.  कर्मचाऱ्यांनी गणवेश घालावा आणि शिस्त पाळली जावी याकरिता आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासोबतच शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारी