शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:27 IST

भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे.

अवसरी  - भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे. पाणीटंचाई व हुमणी किडीचा प्रादुर्भाव आणि इतर कारणामुळे साडेआठ लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. अशी माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली .दत्तात्रयनगर पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा एकोणिसाव्या बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन कार्यक्रमाप्रसंगी भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील बोलत होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, सुषमा शिंदे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, रमेश लबडे, शांताराम हिंगे, दगडू शिंदे, उत्तमराव थोरात, बाळासाहेब घुले, ज्ञानेश्वर गावडे, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब पडवळ, भगवान बोºहाडे, तानाजी जम्बुकर, ज्ञानेश्वर आस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, रमेश कानडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे उपस्थित होते .हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे येणारा साखर हंगाम धोक्यात आला आहे. साखर बाजारभावातील चढ-उतार यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. असे सांगून दिलीप वळसे पाटील म्हणाले भीमाशंकर कारखान्याचा गळीत हंगाम १ आॅक्टोबर रोजी चालू करण्याचे धोरण आहे. कारखान्याने गाळप हंगामाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. हुमणी किड आणि पावसाचे अत्यल्प प्रमाणामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी कारखान्यांनी खर्चात काटकसर करावी. बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर व त्यांची पत्नी मंगल खालकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी संत महंत यांचा सत्कार करण्यात आला .ह. भ .प. अशोक महाराज काळे, हिरामण महाराज कर्डिले ,शंकर महाराज शेवाळे, राजाराम महाराज जाधव , गणेश महाराज वाघमारे,माजी आमदार पोपटराव गावडे यांची भाषणे झाली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या