लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाविद्यालयीन व माध्यमिक शाळांतील सेवकांची बिंदूनामावली तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून सेवकांच्या वेतनासाठी होणारे लाखो रुपयांचे नुकसान कमी होणार आहे. त्यामुळे संस्थेवरील आर्थिक भार कमी होणार असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत दिली.संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात झाली. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. सदानंद फडके सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, आमदार माधुरी मिसाळ, सदस्य जयंत किराड, केशव वझे, सतीश पवार, अॅड. मिहीर प्रभुदेसाई, अॅड. दामोदर भंडारी, सुरेश देवळे, राजेश पटवर्धन, पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्यासह यांसह नियामक व प्रशासकीय मंडळाचे सदस्य सभेला उपस्थित होते. अॅड. जैन यांनी संस्थेतर्फे मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व कामकाजाविषयीची माहिती दिली. नऊ वर्षांनंतर झालेली ही संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा आहे.
संस्थेवरील आर्थिक भार कमी होणार
By admin | Updated: May 9, 2017 03:57 IST