शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर त्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:07 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एनर्जी स्टडी विभागातील विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांसाठीचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काची जबाबदारी घेण्याचे विद्यापीठ प्रशासनाने मान्य केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री अखेर उपोषण मागे घेतले.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एनर्जी स्टडी विभागातील विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांसाठीचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काची जबाबदारी घेण्याचे विद्यापीठ प्रशासनाने मान्य केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री अखेर उपोषण मागे घेतले.स्कूल आॅफ एनर्जी स्टडीज या विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अनुदानातून दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल, असे प्रवेश घेताना स्पष्ट करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना हे विद्यावेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या ५ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.सोमवारी सायंकाळी विद्यार्थ्यांची विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये एनर्जी स्टडी विभागात एमटेकच्या अभ्यासक्रमासाठी २०१६-१७ या वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांसाठीच्या शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काची जबाबदारी घेण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून विद्यावेतनाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर संबंधित रक्कम त्यामधून वळती करून उर्वरित विद्यार्थ्यांना विद्यावेतन अदा केले जाईल, असे परिपत्रक प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी काढले आहे. विद्यापीठफंडातून तत्काळ विद्यार्थ्यांचे थकीत अदा करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.>मनसेचा होता पाठिंबामनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव, जेडीयूचे सरचिटणीस कुलदीप आंबेकर, राष्टÑवादी विद्यार्थी काँग्रेसचे मारुती अवरगंड, अ‍ॅड. श्रीकृष्ण राठोड आदींनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबादिला होता.सोमवारपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने प्रश्न न सोडविल्यास अधिक आक्रमक भूमिका स्वीकारण्याचा इशाराविद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला होता.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ