शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

६५० जणांना गंडा घालणारा अखेर न्यायालयास शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 03:27 IST

२६ लाख ५८ हजारांची फसवणूक; कोथरूड पोलिसांचा तपास

पुणे : भविष्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देण्यासाठी नवजात बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह (स्टेमसेल्स) करून ठेवले आहे, असे भासवून बायोटेक कंपनी बंद करून पसार झालेला ठग अखेर न्यायालयास शरण आला आहे. त्याने आतापर्यंत ६५० जणांची २६ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.डॉ. चैतन्य अरुण पुरंदरे (वय ४८, रा. हरेकृष्ण मंदिर रस्ता, मॉडेल कॉलनी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापुर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. आरोपी २०१६ साली कंपनीची जागा आणि नाळ जतन करायचे बंद साहित्य विकून पसार झाला होता. याबाबत स्मिता गोपाल तिजुरी (वय ६०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. चैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरंदरे यांने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यास पुणे न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक यू. एच. माळी यांनी दिली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पौड रस्त्यावरील शीला विहार कॉलनी येथे सुदर्शन अपार्टमेंटमध्ये डॉ. चैतन्य कॉर्ड लाइफ बायोटेक कार्यालय होते. २७ मे २००८ ते २ जून २००८ या कालावधीत फिर्यादी यांची मुलगी डिलेव्हरीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथे दाखल झाली होती. त्या वेळी त्यांचा विश्वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार महिलांनी स्टेमसेल्सबद्दल त्यांना माहिती दिली. तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह केले जाईल. भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले, तर त्यावर औषध शोधता येऊ शकते. त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून ६५ हजार रुपये घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समोर आले. डॉ. पुरंदरे न्यायालयात हजर झाला असता अ‍ॅड. एस. ए. क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराबआरोपींनी साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराब झाल्याचा अहवाल नॅशनल केमिकल एक्स्पर्टने दिला आहे. स्टेमसेल्स घेतल्यापासून त्या २१ वर्षे जतन करण्याचा करार आरोपी आणि स्टेमसेल्स देणाºया व्यक्तींत झाला होता. मात्र त्यापूर्वीच पुरंदरे याचे भिंग फुटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकPuneपुणे