शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भरली पाळीव प्राण्यांची गंमत जत्रा...

By admin | Updated: January 10, 2017 03:30 IST

पियानो वाजवणारी साची... चालू दुचाकीवर तोल सांभाळणारी साशा... झिंगाटवर सैराट होऊन नाचणारी ती... चेंडू खेळणारा ब्रुनो...

पुणे : पियानो वाजवणारी साची... चालू दुचाकीवर तोल सांभाळणारी साशा... झिंगाटवर सैराट होऊन नाचणारी ती... चेंडू खेळणारा ब्रुनो... हवेतला चेंडू झेलणारा रियो आणि सिंबा... अन् रंगीबेरंगी कपड्यांसह रॅम्पवॉक करत, डौलात चालणारा ‘तो व ती’.. प्रोत्साहन देणारे प्राणिप्रेमी अन् त्यांचे पालक... कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि फोटोग्राफीचे बुथ... विविध जातीची, आकाराची कुत्री कुतूहलाने पाहणारे प्रेक्षक... या सगळ्यामुळे परांजपे विद्यामंदिरला जणू एखाद्या जत्रेचेच स्वरूप आले होते... प्राण्यांची गंमत जत्रेचा उपस्थितांनी आनंद लुटला. निमित्त होते, लोकबिरादरी मित्र मंडळ, पुणेतर्फे आयोजित पाळीव कुत्र्यांच्या गंमत जत्रेचे. अर्थात ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ या विशेष कार्यक्रमाच्या सीझन दोनचे. हेमलकसा (गडचिरोली) येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील जखमी वन्यप्राण्यांच्या अनाथालयाच्या मदतीसाठी कोथरूड येथील भारती विद्याभवनच्या परांजपे विद्यामंदिरमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय विद्याभवनचे सचिव नंदकुमार काकिर्डे, अभिनेत्री संपदा वझे, प्राणी प्रशिक्षक शैलेश ओंकार, लोकबिरादरी मित्र मंडळ पुणेचे शिल्पा तांबे व योगेश कुलकर्णी, पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे मनोज ओसवाल उपस्थित होते. या वेळी कुत्र्यांची देखभाल व खाद्यान्नाविषयी मार्गदर्शनपर सत्रही पार पडले.फॅन्सी ड्रेस, रॅम्पवॉक, अडथळ्यांची शर्यत, लिंबू चमचा, स्ट्रॉच्या साहाय्याने बिस्किट खाणे, वाटीखालील पदार्थ शोधणे, कुत्र्यांना अवगत असलेल्या कलाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध जातीच्या एकूण १०० पेक्षा अधिक कुत्र्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कुत्र्यांच्या खाद्याचे स्टॉल्स, फोटो बूथ, प्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आदीमुळे जत्रेचे स्वरूप आले होते. पियानो वाजवणारी साची, तर हवेत चेंडू झेलणारा रियो प्राणिप्रेमींचे लक्ष वेधून घेत होते.शिल्पा तांबे व योगेश कुलकर्णी यांनी या गंमत जत्रेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन लोकबिरादरी मित्र मंडळ, पुणेमधील युवा कार्यकर्त्यांनी केले होते. शलाखा मुंदडा यांनी परीक्षण केले. तनिमा सरकार यांनी या स्पर्धेचे अतिशय समर्पक समालोचन केले.