शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

कचरा व्यवस्थापनावर भर

By admin | Updated: February 13, 2017 02:32 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वचननाम्याचे प्रकाशन रविवारी झाले़ या जाहीरनाम्यामध्ये पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वचननाम्याचे प्रकाशन रविवारी झाले़ या जाहीरनाम्यामध्ये पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, मलनि:सारण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षित पुणे, पर्यावरण संवर्धन, झोपडपट्टी विकास, तळजाई टेकडीवर २०० एकरांत भव्य आॅक्सिजन पार्क, वाय-फाय झोन असा २१ कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून तो येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे़ काँग्रेसच्या या वचननाम्याचे प्रकाशन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अ‍ॅड़ अभय छाजेड, गोपाळ तिवारी, आबा बागुल आदी उपस्थित होते़ पुढील ५ वर्षांत झोपडपट्टी निर्मूलन करण्याकरिता एसआरए अंतर्गत ५०० चौरस फुटांची घरे मिळावीत, यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ झोपडपट्टीतील लहान मुले गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी पोलीस खात्याच्या मदतीने समुपदेशन केंद्र सुरू करणाऱ दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महापालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची तरतूद करणाऱ पुण्यात आलेल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि अभ्यासिका व इतर सुविधा पुरविण्यात येतील़ मुळा-मुठा सुशोभीकरण्याचा कार्यक्रम आखण्यात येईल़ सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक बँ्रड एम्बेसेडरची नियुक्ती करण्यात येईल़ रस्त्यावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पोलीस ठाण्यात व वाहतूक विभागाला जोडण्यात येतील़ महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये १ फायर स्टेशन देणाऱ जुन्या तालीम पुनर्जीवित करण्यासाठी विशेष निधी, कोथरूड येथील शिवसृष्टी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणाऱ महिला बचतगटाला मोकळ्या जागेमध्ये मार्केट बाजाराकरिता जागा उपलब्ध करू. ज्येष्ठांसाठी विशेष हेल्पलाईन, आठवडे बाजार व पथारीवाल्यांसाठी मिनी मार्केट, मजूरअड्ड्यावर सोयीसुविधा, कचऱ्यापासून तयार होणाऱ्या मिथेनॉल या इंधनाच्या घरगुती गॅससाठी प्रायोगिक तत्त्वावर वापर करणाऱ १०० टक्के घरपट्टी थकबाकी वसूल करणार, शहरातील विविध भागात मोफत वाय-फाय सेवा देणार, अशी विविध आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत़ यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे शहराचा आजवरचा विकास हा काँग्रेसमुळेच झाला आहे़ शहर सर्व दृष्टीने सुज्ज आणि संरक्षित व्हावं़ विकासामध्ये सर्वांचा सहभाग असावा, या दृष्टीने हा वचननामा तयार करण्यात आला आहे़ विविध खेळ, खेळाडू यांना मध्यवस्तीत वसतिगृह उभारण्याचा प्रयत्न आहे़ वर्किंग वूमनसाठी होस्टेल उभारले जाईल, असे विश्वजित कदम यांनी सांगितले़