शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:13 IST

बावधन येथील त्रिमूर्ती चौक ते एलएमडी चौकादरम्यानच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग आज अखेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक दिलीप वेडे-पाटील व शहर सुधारणा समिती उपाध्यक्ष किरण दगडे-पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मोकळा झाला.

बावधन : बावधन येथील त्रिमूर्ती चौक ते एलएमडी चौकादरम्यानच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग आज अखेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक दिलीप वेडे-पाटील व शहर सुधारणा समिती उपाध्यक्ष किरण दगडे-पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मोकळा झाला.या रस्त्याच्या मध्यभागी घर असलेले मारुती बाबूराव अंबिलवादे यांनी सहकार्याची भूमिका घेऊन स.नं. १८/७ मधील स्वत:च्या मालकीचे ०१ आर हे संपूर्ण क्षेत्र पालिकेच्या ताब्यात दिले. या वेळी जेसीबीच्या साह्याने हे घर जमीनदोस्त करून हटविण्यात आले. हा रस्ता मोकळा झाल्याने या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप सोयीचे झाले आहे. घर खाली करीत असताना अंबिलवादे यांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याची व त्यांची दुसºया ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी मारुती अंबिलवादे, त्यांच्या सुविद्य पत्नी व मुलाचा नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक व अल्पना वरपे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. येथील रहिवासी अभिनेता विक्रम गोखले यांनी हा प्रश्न सोडविल्याबद्दल मारुती अंबिलवादे, दिलीप वेडे-पाटील व किरण दगडे-पाटील यांचे अभिनंदन केले. सुमारे ३५ वर्षांपूर्वी बांधलेले घर सोडताना अंबिलवादे कुटुंबीयांना गहिवरून आले व अश्रू अनावर झाले. दरम्यान, रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.मारुती अंबिलवादे यांचे अर्धेअधिक आयुष्य या घरामध्ये गेले. आज हे घर सोडताना त्यांना जेवढे दु:ख आहे, तेवढेच दु:ख मला होत आहे. मात्र, दुसरीकडे गेली २० वर्षे बावधन परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेला वाहतूककोंडीचा प्रश्न हे घर हटविल्यामुळे सुटणार आहे.- दिलीप वेडे-पाटील, नगरसेवकआज माझ्या एका डोळ्यात दु:ख व दुसºया डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप सोयीचे व्हावे, यासाठी अंबिलवादे यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे सर्व नागरिकांच्या वतीने आभार मानतो. भविष्यातही मारुती अंबिलवादे व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारे वैयक्तिक मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. - किरण दगडे-पाटील, नगरसेवक