शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक कंपनी व विक्रेत्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:27 IST

कीटकनाशकांची विनापरवाना वाहतूक व साठवणूक करणे. बनावट लेबल लावून मुदतबाह्य झालेली कीटकनाशके विक्रीकरिता साठवलेली आढळून आल्याने व सदर कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर अप्रमाणित म्हणून अहवाल आल्यानंतर मुलूंड (मुंबई) येथील कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या

लोणी काळभोर - कीटकनाशकांची विनापरवाना वाहतूक व साठवणूक करणे. बनावट लेबल लावून मुदतबाह्य झालेली कीटकनाशके विक्रीकरिता साठवलेली आढळून आल्याने व सदर कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर अप्रमाणित म्हणून अहवाल आल्यानंतर मुलूंड (मुंबई) येथील कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीचे मालक व संचालक आणि कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कीटकनाशक विक्रेत्यावर कीटकनाशक कायदा व अधिनियमअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी प्रभारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सत्यजित शितोळे (वय ३०, रा. ३०५ रूद्र सोसायटी, केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामश्री केमिकल्स, विकास पॅरडाईजजवळ, मुलूंड (पश्चिम) या कीटकनाशक कंपनीचे मालक व संचालक तसेच कुंजीरवाडी येथील मे. म्हातोबा जोगेश्वरी शेती भंडार या दुकानातील कीटकनाशक विक्रेते दत्तात्रय जवळकर रा. (कुंजीरवाडी) यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सत्यजित शितोळे यांच्यासमवेत गुणनियंत्रक तज्ज्ञ अधिकारी व हवेली पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी १९ मार्च २०१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास कुंजीरवाडी येथील दत्तात्रय जवळकर यांचे मे. म्हातोबा जोगेश्वरी शेती भंडार या कीटकनाशक विक्री केंद्राची व गोडाऊनची तपासणी केली असता तेथे त्यांना रामश्री केमिकल्स या कंपनीचे अ‍ॅमिनी सॉफ्ट या कीटकनाशकाचे २०० लिटरचे ६ ड्रम, ग्लायफोसेटचे ५०० मिलीलिटरचे ८० नग, आणी झुआरी अ‍ॅग्रो केमिकल्स लिमिटेड, गोवा या कंपनीचे ४० लिटर कीटकनाशक मिळून आले होते. या दुकानाचा विक्री परवाना तपासला असता सदर औषधे विक्री करण्याचा परवान्यामध्ये समावेश नसल्याचे आढळून आले.चौकशीत या पथकाला रामश्री केमिकल या कंपनीस या कीटकनाशक उत्पादनास महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचा परवाना नसल्याचे दिसून आले. गोडाऊनमध्ये असलेल्या औषधांची पाहणी केली असता त्यांना ती मुदतबाह्य झालेली तसेच तेथील २० बाटल्यांवरील लेबल फाडलेले असल्याचे दिसून आले. तसेच तेथे लेबल छापायचे मशिन, बॉक्स व थिनर आढळून आले. यांमुळे या बाटल्या रिलेबलिंग व रिपॅकिंग केल्याचे दिसले. ड्रममधील कीटकनाशक पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणे