शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार टिळेकरसह बंधूवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:22 IST

बंदुकीचा धाक दाखवत तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी आमदार योगेश टिळेकरसहित

पुणे : बंदुकीचा धाक दाखवत तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी आमदार योगेश टिळेकरसहित त्यांच्या बंधूसह इतरांवर गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश लष्कर कोर्टातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. कोकाटे यांनी दिला आहे.या प्रकरणी योगेश लक्ष्मण कामठे (वय ३२, रा. कोंढवा बुद्रुक, भोलेनाथ चौक) यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमदार योगेश पुंडलिक टिळेकर, त्यांचे बंधू चेतन पुंडलिक टिळेकर (दोघेही रा. टिळेकर हाऊस, कोंढवा बुद्रुक), आनंद देशमुख (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक), गणेश मेमाणे व त्यांचे इतर ५ ते ६ साथीदारांविरुद्ध खासगी तक्रार दाखल केली होती.त्यानुसार न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. फिर्यादी कामठे यांचे मित्र अतुल हनुमंत गीते यांना आमदार टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांनी घरी बोलावून मारहाण करून आई-वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्यासोबत महेश हनुमंत कामठे, ओंकार भोसले, १ जानेवारी रोजी अतुल यांच्यासह तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी योगेश टिळेकर यांनी फिर्यादींना कॉल करून शिवीगाळ केली. तसेच ‘आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुला खानदानासहीत संपवून टाकेन. तुझ्यात दम असला तर गुन्हा दाखल करून दाखव’, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून फोन कट केला. तेवढ्यात चेतन पुंडलिक टिळेकर, आनंद देशमुख, गणेश मेमाणे व इतर ५ ते ६ जण पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यावेळी चेतन टिळेकर यांनी फिर्यादीस पुन्हा शिवीगाळ करत आमदार साहेबांचा फोन आला तरी तू ऐकत नाही का़, असे म्हणत फिर्यादी यांच्या डोक्याला बंदूक लावली व त्यांना उचलून गाडीत बसवले. त्यानंतर गाडीत बसलेल्या आनंद देशमुख यांनी हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला. स्वत:ची सुटका करून घेत फिर्यादी यांनी ससून रुग्णालयात जाऊन उपचार घेतले, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते.