शनिवारी (दि. १३) सायंकाळी वडापुरी येथील श्रीनाथ विद्यालयाच्या मोकळ्या मैदानात आरोपी व गावातील मुले दररोज क्रिकेट खेळतात. फिर्यादी यांचे घर मैदानालगत असल्याने क्रिकेटचा चेंडू वारंवार फिर्यादी यांच्या अंगणात येत असल्याने फिर्यादी यांचे कुटुंबाला त्याचा त्रास होत होता. याबाबतची तक्रार फिर्यादीच्या आईने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे केली. त्यावर भरणे यांनी क्रिकेट खेळणाऱ्यांनी दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका अशा सूचना दिल्या होत्या. याचा राग वरील आरोपींनी मनात धरून फिर्यादी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याची तक्रार दिली.
तर सूरज विजय चंदनशिवे यांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडापुरी येथील श्रीनाथ विद्यालयाचे मोकळे मैदानावर फिर्यादी व गावातील मुले क्रिकेट खेळत होतो. क्रिकेट खेळताना चेंडू आरोपी विकास भीमराव गायकवाड यांच्या अंगणात गेला होता. हा चेंडु हा फिर्यादी आणावयास गेले असता आरोपी विकास गायकवाड याने फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण करत मारहाण केल्याची फिर्याद दिली.